पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिरेखांवर आधारित हिंदी मालिकेला ‘नमुने’ असं नाव देणं निव्वळ दुर्भाग्यपूर्ण !

पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिरेखांवर आधारित हिंदी मालिकेला ‘नमुने’ असं नाव देणं निव्वळ दुर्भाग्यपूर्ण !

“ख़ुशी का डॉक्टर, जो ले आया है खुशिया बांटनेवाले ‘नमूनों’ की दवाई” असं म्हणत पु. ल. देशपांडे लिखित व्यक्तिरेखांवर आधारित असलेल्या सब टीवीवरील मालिकेचा ट्रेलर ४ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. पुलंनी आपल्या लेखणीने ज्या व्यक्तींची पात्र अजरामर केली.. त्या व्यक्तींच्या भावविश्वात, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात करोडो लोक डुबकी मारून आनंदी झाले, अशा पात्रांना ‘नमुने’ असं म्हणणं म्हणजे त्या पात्रांचा अनादर करण्यासारखं आहे. कारण बोलीभाषेत आपण ‘नमुने’ हा शब्द मूर्ख किंवा विचित्र व्यक्तींसाठी वापरतो.

हा ट्रेलर सब टीवी ट्विटरवर टाकत असताना त्यांनी जो मजकूर लिहिलेला आहे तो हि गमतीशीर आहे. त्यांनी लिहिलंय..

Bharat aur Marathi Saahitya ke Dhurandhar Pu. La. Deshpande ki dilchasp kahaaniyon pe Aadharit hamaari yeh nayi Peshkash #Namune. Sangeetkaar, lekhakh, kavi aur ab Khushiyon ke doctor bhi. 21st July se jaaniye inke kisse, har Shanivaar aur Ravivaar raat 9 baje on SABTV.

READ MORE : रुपेरी पडदा ‘पुल’कित होण्यासाठी सज्ज

 

“भारत और मराठी साहित्य ???” पहिला शब्द ‘भारतीय’ असा हवा होता का ? आणि  महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का ?? असो हि खूप छोटी चूक आहे पण पुढे ते असं लिहितात कि, “संगीतकार, लेखक, कवी और अब खुशियों के डॉक्टर भी.” अब ??? म्हणजे सब टीवीच्या मते हि ‘नमुने’ नावाची मालिका सुरु होतेय तेव्हापासूनच पुलं ‘आनंदाचे डॉक्टर’ बनतील. (त्याआधी ते आनंदाचे रुग्ण असावेत बहुदा.) ट्रेलर आणि लिखित मजकुरामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पुलं फक्त संगीतकार, लेखक, कवीच न्हवते तर पुलं एक उत्तम वक्ते होते, नाटककार होते, दिग्दर्शक होते, वादक होते, अभिनेते होते, गायक होते. पुलंनी हि सगळी बिरूद स्वतःच्या हिमतीने मिळवली अन मगच ती मिरवली. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची प्रेक्षकांना पूर्ण ओळख न करून देता त्यांना ‘खुशियों के डॉक्टर’ ह्या सारखी सर्वसामान्य संज्ञेने संबोधून जणू काही आपणच पुलंना मोठेपण देत आहोत असा आव आणणं हे फार चुकीचं आहे. ह्या मालिकेचा ट्रेलर हि अतिशय टुकार पद्धतीने चित्रित करण्यात आलेला आहे. चित्रीकरण व्याकरणाच्या कित्येक चुका आपल्याला त्यात आढळून येतील.

६ जुलै रोजी सब टीवीने अजून एक ट्वीट करून पुलंचा एक विचार मांडलेला आहे. त्याचा मजकूर लिहिताना “भारत और मराठी साहित्य” हि त्यांची आधीची चूक त्यांनी सुधारलेली आहे, पण पुन्हा एक गमतीशीर चूक त्यांनी केलेली आहे.. मजकूर असा आहे…

Marathi sahitya ke pratishthit lekhakh Pu.La  Deshpande ke anmol shabd gholenge aapki zindagi mein khushi. Laa rahe hai hum unki khushiyon ki philosophy 21st July se, raat 9 baje in Namune.

‘पु.ल.देशपांडे के अनमोल शब्द’ मराठीमध्ये होते. तर ते शब्द हिंदी मालिकेत कसे घोलणार आपके आयुष्य में ख़ुशी ? बरं हा हि मुद्दा आपण छोटी गोष्ट म्हणून सोडून देऊ पण त्यासोबत त्यांनी पुलंचा एक विचार मांडलेला आहे तो म्हणजे

इस दुनिया में ‘कौन’ कह रहा है से ज्यादा महत्व ‘क्या’ कह रहा है रखता है I

पण प्रत्यक्षात पुलंनी याच्या उलट विचार मांडला होता. विचार कसला ते तर एक ओघवतं वाक्य होतं ‘असा मी असा मी’ या नाटकातलं. जिथे पुलं म्हणतात…

“कुणीसं म्हंटलंय, कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी.. तसा मी.. असा मी असा मी. खरं सांगू का हे कुणीसं वगैरे काही म्हंटलेलं नाही, मीच म्हंटलंलं आहे. पण कुणीसं म्हंटलंय असं म्हंटल्याशिवाय आपणदेखील ‘काय म्हंटलंय?’ हे ऐकायला कान टवकारले नसते. या जगात ‘काय’ म्हंटलंय यापेक्षा ‘कोणी’ म्हंटलंय ह्यालाच अधिक महत्व आहे, हे मला कळून चुकलंय. थोर मानसंदेखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही, पण ती थोर असतात हे महत्वाचं. असला कुठलाही थोरपणा चिकटायचा जिथे सुतराम म्हणतात तसा संबंध न्हवता, अशा एका परिस्थितीत वाढलेला असा मी एक आपला असा मी आहे.

पुलंनी ५० वर्षापूर्वी लिहिलेलं साहित्य आज ही टवटवीत आहे. आज हि त्यावर नाटक, चित्रपट, मालिका बनत आहेत, हे त्या साहित्याच्या सार्वकालीकत्वाचं प्रमाण आहे. अशा मनोरंजनाच्या खजान्याला हाताळणारे कुशल असावेत अशी साधी अपेक्षा एक प्रेक्षक म्हणून आपण करूच शकतो. पण ज्यांना पुलं अजून कळलेलेचं नाहीत ते पुलंच्या साहित्याला न्याय देऊ शकतील कि नाही याबद्दल साशंकता आहे.

       मनोरंजन विश्वामधील अशाच काही मुद्द्यांच्या विश्लेषण आणि समीक्षण वाचण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.