सैराट फेम रिंकू आणि आकाश पुन्हा करणार आपल्या चाहत्यांवर जादू..!!

सैराट फेम रिंकू आणि आकाश पुन्हा करणार आपल्या चाहत्यांवर जादू..!!

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी असा काहीसा फील देऊन गेला तो सैराट.. ह्या चित्रपटाला मराठीच काय तर महाराष्ट्राबाहेरही चाहत्यांनी डोक्यावर घेतले. आणि त्यातले राजा राणी म्हणजे आर्ची आणि परश्या तर लोकांच्या गळ्यातले ताईत बनले. पण खरे कौतुक झाले ते दिग्दर्शक नागराज मंजुळे ह्यांचे. कारण छोट्याश्या गावातली कलाकार मंडळी उचलून त्यांच्याकडून उत्तम अभिनय करवून घ्यायचा आणि त्यांच्या जीवावर चित्रपट १०० कोटींच्या घरात न्यायचा.. गोडफादरच जणू..!!

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

ह्याच तिघांची ‘झुंड’ आता पुन्हा सज्ज होतेय तुमच्यावर जादू करायला. आणि त्यांच्या सोबत आहेत बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन..!! अमिताभ बच्चन ह्या सिनेमा मध्ये प्रमुख भूमिकेत असल्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अमिताभ ह्यांचे एस टी बस मधून आणि बैलगाडीतून प्रवासाचे फोटो पाहून तर चाहते आश्चर्यचकित झाले होते. पण ते झुंड सिनेमांमधल्या कामाचेच शूट होते. आता खुद्द अमिताभ बच्चन मराठी सिनेमात तेही नागराज मंजुळेंसोबत असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. आणि त्यात आणखीन भर पडली ती आकाश आणि रिंकू मुळे. सैराटच्या यशानंतर इतक्या वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र दिसणार. त्यामुळे आर्ची परश्या आणि मंजुळे ह्यांचा त्रिकोण आणि त्यात अमिताभ बच्चन असल्याने बनलेली ही अशी खासमखास चौकडी स्क्रिनवर काय धमाल करणार आहेत हे पहायला आता चाहत्यांना धीर धरवेल असे वाटत नाही.

मराठी चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेले रिंकू आणि आकाश हे दोघे देखील अमिताभ सरांबरोबर काम करायला मिळणार म्हणून खुशीत आहेत. गरिबांच्या वस्तीत राहणाऱ्या तरुणांची भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे आणि त्यांना फुटबॉल शिकवणारे त्यांचे प्रशिक्षक असणार मिस्टर बच्चन..!! खेळावर आधारित चित्रपट असल्याने तो क्षणाक्षणाला उत्कंठा वर्धक असणार हे नक्की आणि मंजुळेचे दिग्दर्शन प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत निःसंशय खिळवून ठेवणार हे ही ओघाने आलेच. ह्या सिनेमाचे शूटिंग चालू झाले आहे आणि ह्याचे पोस्टर आणि ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल असा अंदाज आहे. तर मंडळी आपल्या आवडत्या कलाकारांना एका धुवाधार मराठी खेळपटात पाहण्यासाठी तयार राहा..!!

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author