वाय झेड ते भाई व्यक्ती कि वल्ली प्रवास : सागर देशमुख

वाय झेड ते भाई व्यक्ती कि वल्ली प्रवास : सागर देशमुख

वाय झेड या मराठी चित्रपटातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणारा हरहुन्नरी कलाकार सागर देशमुख. पारंपरिक नायकाच्या भूमिकेसाठी विशिष्ट शरीरयष्टी किंवा अतिशय देखणेपणा आवश्यक असतो असे नाही तर त्यासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीरेखेबरहुकूम असावी याचा प्रत्यय वाय झेड या मराठी चित्रपटातून सागर देशमुख याने दिला. हंटर या हिंदी चित्रपटातील त्याची भूमिका अगदी छोटीशीच परंतु अतिशय वाखाणण्याजोगी होती. सागर देशमुख ने केलेल्या स्टेट वेर्सेस मालती म्हस्के या चित्रपटातील भूमिकादेखील कबिल ए तारीफ अशीच म्हणावी लागेल.  सागर देशमुखने आजवर मोजकेच चित्रपट केले त्यापैकी त्याचा वाय झेड हा चित्रपट फार गाजला. त्यातील त्याची गजानन ही व्यक्तीरेखा खूप लोकप्रिय झाली होती. कोणत्याही पस्तिशी ओलांडलेल्या पुरुषाला त्याच्यापेक्षा लहान पिढीबद्दल हेवा वाटू शकतो हे गजानन अक्षरशः पडद्यावर जगला. गजाननचा वयपरत्वे आलेला भिडस्त स्वभाव सागरने असा काही रेखाटला की अनेकांना त्यात आपलंच प्रतिबिंब पाहतोय असा भास झाला.

 

READ ALSO : मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

आता सागरची वाटचाल सुरु झाली आहे ती महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व व थोर विनोदी लेखक पु लं देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारण्याच्या दिशेने. पू.लं.नी अनेक अजरामर कलाकृती रसिक प्रेक्षकांना दिल्या आहेत. त्यांचे साहित्य, चित्रपट यांचा आजही आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करतो. ज्यांनी अनेक वर्षे लोकांना हसवले ते हि पोटभरून त्या पु.ल. चे नुसते नाव जरी घेतले तरी ओठावर निखळ हास्य उमटते. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या अवलियाच्या जीवनावर आधारित त्यांचा चित्रपट ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सागर देशपांडे हा पु.लं. च्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या आधी प्रेक्षकांनी पु.लं.च्या भूमिकेत अतुल कुलकर्णी आणि निखील रत्नपारखी यांना पाहिले आहे. सागरची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. थोडक्यातच हा शिवधनुष्य सागर कसा पेलणार याचा प्रत्यय प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर नक्की येईलच. नुकताच भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा टीझर आला आहे. त्यात प्रेक्षकांना भाईंची एक छोटी झलक पाहायला मिळते ज्यात सागर अगदी हुबेहूब पु.लं देशपांडे यांच्यासारखा दिसत आहे. या आधीच्या चित्रपटाप्रमाणे सागर त्याची जादू त्याच्या आगामी चित्रपटातही कायम ठेवेल असे वाटते. भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट ४ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होत आहे. चला पू.लं. च्या विनोदी सफरीमध्ये आपणही सहभागी होऊन मनसोक्त हसुया.

सागर, तुला तुझ्या आगामी चित्रपटासाठी फिल्मिभोंगा मराठी कडून खूप खूप शुभेच्छा

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author