कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…

कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…

तुम्हाला आठवतेय का पुढचं पाऊल या मालिकेतील कल्याणी? सहनशील, सोशीक , आज्ञाधारक सून, जिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनुन त्यांच्या घरात पोहचली. ती कल्याणी म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी जीने साकारलेली सुनेची भूमिका फार प्रसिद्ध झाली. जुईने या मालिकेपूर्वी माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत एक छोटी भूमिका साकारली होती. तिची ती खलभूमिका अगदी अल्पकाळासाठी होती. यानंतर तिने छोट्या पडद्यावर सोशीक सुन अगदी कसोशीने साकारली. जुई गडकरी एक व्यक्ति म्हणुन खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कळाली ती बिग बॉस मराठीमूळे. अभिनय क्षेत्रात ती पारंगत आहेच पण त्याच बरोबरीने ती एक कर्तव्यदक्ष मुलगीदेखील आहे. अभिनयाबरोबर ती उत्तम स्वयंपाक करते हा विशेषगुण बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांना समजला.

READ ALSO : “गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” या गाण्यामागची कहाणी…

जुईचा स्वभाव खूप गोड आहे. बिग बॉस मराठीनंतर जुई काय करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. आपली सर्वांची लाडकी जुई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती मराठी चित्रपट करणार की मालिका? असा प्रश्न पडला असेल ना? नेहमीच एकाच प्रकारच्या साचेबद्ध मालिका आणि नेहमीचाच मसाला न देता नाविन्यपूर्ण नजराणा प्रेक्षकांना देणार्‍या झी युवा वाहिनीवर नव्यानेच दाखल होणा-या वर्तुळ या मालिकेतून जुई नायिका म्हणून झळकणार आहे. या मालिकेत ती मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मीनाक्षी ही एक अनाथ मुलगी असून अपघाताने तिची भेट अभिजीत परांजपे सोबत होते जो या मालिकेचा नायक आहे. अभिजीतची भूमिका विकास पाटीलने साकारली आहे. मालिकेचे कथानक खूप रंजक आहे. मीनाक्षीचा भूतकाळ तिच्या भविष्य काळात डोकावतो आहे.

सध्या वर्तुळ या मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आयुष्य हे वर्तुळासारखं असतं, जिथुन सुरु होतं तिथेच येऊन संपतं. अश्याप्रकारे मालिकेची प्रसिद्धि करण्यात येत आहे. मालिका गूढ असेल की नसेल? मीनाक्षीचा काय भूतकाळ असेल? मीनाक्षीच्या भुतकाळामुळे तिच्या आणि अभिजीतच्या नात्यातील विश्वासाला तडा जाईल का? ती सगळ्यांपासून तिचा भूतकाळ का लपवत आहे? या सर्वांचा उलगडा लवकरच होईल. कारण वर्तुळ ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री ९.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author