बहुचर्चित कागर चित्रपटासाठी अजून थोडे थांबावे लागणार दोस्तांनो..!!

बहुचर्चित कागर चित्रपटासाठी अजून थोडे थांबावे लागणार दोस्तांनो..!! कारण ऐकलत तर रिंकू बद्दल अजून आदरच वाटेल.

 

नवीन पुस्तक, नवीन शो किंवा आपल्या ऑफिस मध्ये नवीन प्रोजेक्ट येणार असेल तर आपल्याला किती उत्सुकता असते.. कधी एकदा आपलं काम सगळ्यांपुढे मांडतोय आणि कधी एकदा आपल्याला सगळ्यांची शाबासकी, कौतुकाची थाप मिळतीये असं होतं.. काही चुका असतील तर त्याही सांगणारे हवे असतात.. पण जर आपलं काम लांबणीवर पडलं तर नक्कीच खंत वाटते आपल्याला.. वय कितीही असो, आपण कितीही परिपक्व असो पण थोडे तरी वाईट वाटतेच.. बघा ना नव्या नवेल्या रिंकू राजगुरूचा तर आगामी चित्रपटच लांबणीवर पडलाय.  एखाद्या नवीन येणाऱ्या प्रोजेक्ट साठी खूप कष्ट घेतलेलं असल्यावर तर धीर धरवत नाही. रिंकूने देखील खूप मेहनतीने स्वतःच्या लुक वर काम केले आहे. तरीही चित्रपट रिलीज डेट पुढे घेतलीये. रिंकुला काय वाटत असेल नाही..?? काय कारण असेल पण ह्यामागे..?

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

एखाद्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटांशी तिची स्पर्धा होतेय किंवा थेटर मिळत नाही असे काही कारण नाहीये बरं… करण इतकं जेन्यूईन आहे इतके महत्वाचे आहे की आपल्याला रिंकू बद्दल खरच खूप आदर वाटेल. प्रेमकथा असेल म्हणून वॅलेन्टाईन्स डे च्या मुहूर्ताला तिचा चित्रपट ‘कागर’ प्रदर्शित होणार होता पण आता अजून काही दिवस प्रतीक्षा करायला लागणार आहे. कारण असे आहे की आपल्या रिंकुची परीक्षा आहे ना..!! होय.. रिंकू फक्त बारावीत आहे आणि तिची बारावीच्या बोर्डाची परीक्षा आहे.. आता बोर्डाची परीक्षा म्हटलं की अभ्यास एके अभ्यास.. त्यातून हल्ली मुलींच्या शिक्षणाला अतोनात महत्व आहे. त्यामुळे परीक्षेसाठी कागर च्या टीमने देखील रिंकुला सपोर्ट करायचे ठरवले आहे.

पाहिले तर रिंकू चे खूप खूप कौतुक की काम करत ती स्वतःच्या अभ्यासाकडे, शिकण्याकडे दुर्लक्ष करत नाही. कागर च्या टीम मधील सगळ्यांचे देखील खूप कौतुक कारण त्यांनी त्यांच्या चित्रपटपुढे रिंकूच्या अभ्यासाला महत्व दिले. हा एक प्रकारे समाजापुढे ठेवलेला आदर्शच आहे. चित्रपट प्रदर्शन लांबले गेले असले तरी रिंकू ला चांगले मार्क मिळतील अशीच सगळ्यांची इच्छा आहे.. चांगले मार्क परीक्षेतही आणि चित्रपटाला देखील.. टीम फिल्मीभोंगा तर्फे रिंकुला चित्रपटाच्या यशासाठी खूप शुभेच्छा आणि परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author