सैराटची रिंकू ‘कागर’मधुन प्रेक्षकांच्या भेटीस: साजरा करुया प्रेमाचा सोहळा

सैराटची रिंकू ‘कागर’मधुन प्रेक्षकांच्या भेटीस: साजरा करुया प्रेमाचा सोहळा

सैराटमधुन चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण केलेल्या रिंकू राजगुरुचा ‘कागर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेमाचा सोहळा साजरा करण्यासाठी हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे. रिंकू राजगुरु ही कागर या चित्रपटातून पुन्हा मोठया पडद्यावर येत आहे हे माहीत होते परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत अधिकृत काहीच माहिती नव्हती. अखेर नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याचाच अर्थ असा की हा चित्रपट नक्कीच एखादी सुरेल प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत असणार. चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवरुन तरी हा चित्रपट एक प्रेमकथा असेल असा अंदाज सध्यातरी बांधायला हरकत नाही.

एक नाविन्यपूर्ण बाब अशी की ह्या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक एकत्र येऊन काम करत आहेत. हे खरच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांना त्यांच्या ‘रिंगण’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारा हा अतिशय भावनिक चित्रपट होता. तसेच चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड, हे दोन चित्रपट मकरंदने यापूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न आशयाचे होते. त्यामुळे कागर चित्रपटाविषयी उत्सुकता अजून वाढली आहे. चित्रपटाचे नावदेखील अगदी वेगळ्या धाटणीचे आहे.

 

READ ALSO : मराठी संगीत विश्वातील संगीताचा देव हरपला: ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’,

कागरचे पोस्टर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. रिंकू एका पडद्याआड सजून उभी आहे.  तिच्या नजरेत एक करारी पणा आहे जो तिचे सौंदर्य अजूनच खुलवतो. पोस्टरमध्ये पडदा, त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गराडा आणि रिंकूचे विलक्षण सौंदर्य यामुळे हे पोस्टर अधिकच विलोभनीय दिसत आहे. मात्र त्यामुळे कथानकाचा अंदाज मात्र बांधता येत नाही. पण प्रदर्शनाची तारीख मात्र प्रेमकथेचा बाज अधोरेखित करतो. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकुसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. योगायोगाने मकरंद माने आणि रिंकु हे दोन्ही अकलूजवासीय या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर मग होताय ना तयार १४ फेब्रुवारी 2019 ला प्रेमाचा सोहळा साजरा करण्यासाठी…?

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author