कामदेव प्रसन्न वेबसिरीज मधून अनुभवायला मिळणार कारंडे स्टाईल भन्नाट विनोद..!!

कामदेव प्रसन्न वेबसिरीज मधून अनुभवायला मिळणार कारंडे स्टाईल भन्नाट विनोद..!!

विनोदवीर सागर कारंडे पुन्हा हसवायला येतोय मात्र एका नवीन माध्यमातून. सध्या डिजिटलचा जमाना आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं, रंगमंच, टीव्ही आणि सिनेमा नंतर हेच प्रभावी माध्यम आहे. इंग्लिश हिंदी वेबसिरीज इतकीच मराठी वेबसिरीजच्या माध्यमाची क्रेझ निःसंशय वाढत आहे. आणि रोजच नवीन काहीतरी पहायची प्रेक्षकांना उत्सुकता असतेच. त्यामुळे आता ह्या प्रवाहापासून सागर कारंडे तरी कसा काय लांब राहील..?

विनोदाचे अचूक टायमिंग असलेला सागर आपल्या विनोदी पात्रांमुळे खूप प्रसिद्ध आहे. फु बाई फु, चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून पूर्वी आणि आत्ताही तो चाहत्यांना हसवून हसवून लोळवत आहे. स्त्री व्यक्तिर्वखा असो की पोस्टमास्टरची सागरने आपल्या अभिनयाचा स्पार्क चाहत्यांपर्यंत कधीच पोहचवली आहे. आता त्याला हंगामा प्लेची आगामी वेबसिरीज ‘श्री कामदेव प्रसन्न’ ह्या प्लॅटफॉर्म वरून रसिकांना प्रसन्न करून घ्यायची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे. कोणत्याही प्रकारच्या विनोदातून लोकांचं निखळ मनोरंजन करणे हा हातखंडा असलेला भाऊ कदम देखीलसागर कारांडेच्या सोबतीला आहे. त्याचबरोबर भाग्यश्री मोटे ही अभिनेत्री देखील ह्याच वेबसिरीजच्या माध्यमातून सागर बरोबर वेबच्या जादुई दुनियेत पदार्पण करत आहे. विनय येडेकर आणि आशा शेलार सारखे आणखीही कलाकार ह्यात आपल्याला दिसतील. अशा सगळ्या विनोदवीरांमुळे जोरदार हास्य करंजी फुलणार हे नक्की.

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

आधीही वेबसिरीज मध्ये काम केल्यामुळे आता ह्या माध्यमाचा अनुभव गाठीशी असणारा भाऊ कदम तर ह्या सिरीज साठी खूपच उत्साही वाटतो करण त्याच्या वाट्याला एकदम हटके भूमिका आलेली आहे. ह्या वेबसिरीजचे शुटिंग सुरू झाले आहे आणि सागरला त्याच्या पात्राच्या आयुष्यात मदत करताना दिसेल तो भाऊ कदम. विनोदाच्या आगळ्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येईल आणि तेव्हाच सागर कारंडे ह्या माध्यमातून लोकांना किती भावतो हे बघणे मजेदार ठरेल. सागर कारंडे देखील डिजिटल प्लॅटफॉर्म वर काम करण्यास खूप उत्सुक आहे. कॅफे मराठी आणि हंगामा डिजिटल मीडिया ह्यांची निर्मिती असलेली ह्या वेब वेबसिरीजच्या यशासाठी सागर कारंडेला फिल्मीभोंगा तर्फे खूप शुभेच्छा..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author