कला आणि कलाकार

महागुरू म्हणजे आपले आवडते सचिन पीळगावकर उत्तम अभिनेता, अप्रतिम गायक, सगज निर्माता, कौशल्यपूर्ण दिग्दर्शक एका अर्थाने सांगायचे झाले तर एक अष्टपैलू कलाकार असे आपण त्यांच्या बद्दल बोलू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांनी सर्वात जास्त काळ घालवला आहे. पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिला आहे. प्रेक्षक आणि अभिनेता यांचे नाते हे खूप नाजूक दुध आणि दुधाची साय याप्रमाणे असते. दोघेही एकमेकांना पूरक असत्तात, कोणत्याही अभिनेत्याला त्याच्या कलाकृतीसाठी दाद ही प्रेक्षक, चाहते, यांच्याकडून मिळते. एखाद्या अभिनेता किंवा कलाकाराकडून रसिक प्रेक्षकांना, किंवा त्याच्या चाहत्याना नवीन कलाकृती मिळत असते. मी हे सर्व तुमच्याशी बोलते कारण सध्या काही रसिक प्रेक्षकांनी आपले आवडते महागुरू म्हणजे सचिन पीळगावकर यांच्या एका व्हिडीओ बद्दल फारच टीका करत आहे. त्यातील काही दृश्य आणि गाण्यातील शब्द हे आपेक्षार्य आहे, असे म्हटले जात आहे. काहींनी तर त्यांच्या प्रतिमेबद्दल फारच टीका केल्या आहे.

 

READ ALSO : हाक देता तुला साद जाते मला

जेव्हा आपण एखाद्या अभिनेत्याला त्याच्या कलाकृतीबद्दल डोक्यावर उचलून धरतो तेव्हा तो एक माणूसही आहे हे आपण लक्षात ठेवायला आहे. कोणताही अभिनेता हा कोणतीही भूमिका साकारता असताना तो त्याच्या मर्जीने करत असला तरी तेव्हा तो अभिनेता करता असलेल्या  भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या अभिनेत्याला त्याच्या दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार काम करावे लागते, तेव्हाच तर ती कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. एखादी कलाकृती ही जर आपल्याला आवडली नाही तर त्या कलाकृतीसाठी आपण त्या कलाकाराला धारेवर धरणे किंवा त्याला त्यासाठी जबाबदार धरणे कितपत योग्य आहे हे आपने ठरवले पाहिजे.

जर ती कलाकृती आवडली नाही तर तुमच्याकडे पर्याय आहे ती तुम्ही बघू नका. पण रसिक प्रेक्षक आपण स्वत:ला संबोधतो तेव्हा आपणही प्रेक्षक म्हणून काही तरी देण लागतो हे आपण कदाचित सध्याच्या काळात विसरलो आहोत. फक्त कोणत्याही कलाकृतीबद्दल आपले मत व्यक्त करणे हे गरजेचे आहे, किंवा आपण सर्वांच्या नजरेत येण्यासाठी जर आपण योग्य आणि अयोग्य या पथंडीत आपण बसवून त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपण त्या अभिनेत्याला दोष देणे कितपत योग्य आहे. ते आपण ठरवले पाहिजे.

आता सध्या जास्त चर्चेत असलेल्या सचिन पिळगावकर यांच्या व्हिडीओ गाण्याबद्दल, हे गाणे जरी प्रेक्षकांच्या पसंतीस नाही पडले तरी त्याबद्दल आपण का आणि किती प्रतिक्रिया द्यायच्या या बद्दल नक्कीच विचार करायला पाहिजे. आक्षेप घेणे व आक्षेपार्य असणे? ठरवू या…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author