ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पुन्हा अवतरणार मोठ्या पडद्यावर ‘नलू’ च्या भूमिकेतून.

ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पुन्हा  अवतरणार मोठ्या पडद्यावर ‘नलू’ च्या भूमिकेतून. तेही सचिन पिळगावकरांसोबत.

एका लग्नाची गोष्ट ह्या नाटकामुळे अवघ्या महाराष्ट्राची लाडकी झालेली अभिनेत्री, लग्नानंतर काही वर्षे सिनेमा आणि नाटक ह्या दोन्ही पासून जरा दूर झाली होती. आता संसार सुरू झाल्यावर काही कौटुंबिक बंधनं पाळावी लागतातच की. संसार आणि करिअर दोन्ही एकाचवेळी करायचं म्हणजे तारेवरची कसरतंच असते. तशी कसरत केली नाही म्हणून कविता लाड ह्या अभिनयाच्या दुनियेत परत त्याच जोशात पुन्हा अवतरली आहे.

पण संसारात बिझी झाल्यावर संसारातले बारकावे कळून जर पुन्हा अभिनय करायला सुरुवात केली ना तर तो अभिनय आणखीनच परफेक्ट होऊ शकतो. लग्न होण्यापूर्वी कविताचं एका लग्नाची गोष्ट हे नाटक चालू होतं आणि गाजत होतं. आता लग्न झाल्यावर ती पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे ती म्हणजे “नलू” ह्या भूमिकेतून. ही नलू कोण ? तर नवीन येणाऱ्या मराठी चित्रपटातली कर्तव्य दक्ष, आदर्श गृहिणी. जी संसार अगदी उत्कृष्ट करते, अडचणीच्या वेळी आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहून नवऱ्याला आधार देते. आणि सरळ साधेपणाने राहते. संसारात गोड पण वेळ पडली तर कडक निर्णय घेऊ शकते ती, ही “नलू”.  सचिन पिळगावकारांचा हा चित्रपट ११ जानेवारीला  रिलीज होतोय, म्हणजे लगेचच, पाहायला मिळणार आहे हा चित्रपट आपल्या सगळ्यांना, वाट पाहायला नाही लागणार. “लव्ह यू जिंदगी” ह्या चित्रपटात कविता लाड/मेढेकर  एक भन्नाट भूमिका साकारणार आहे. जी भूमिका ती स्वतः च्या संसारात सुद्धा अगदी तशीच  सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते आहे, म्हणून ही भूमिका तिला सहज सोपी वाटली. 

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

सचिन पिळगावकर ह्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची खूप दिवसापासूनची इच्छा ह्या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली अशी कविता लाडने सिनेमाच्या सेटवर झालेल्या गप्पांमध्ये माहिती दिली. नाटक आणि सिनेमा ह्या दोन्ही प्रेक्षकांना खुश करणारी अशी तिची ही भूमिका आहे. ‘लव्ह यू जिंदगी‘ ह्या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि कविता लाड पती – पत्नीच्या नात्यात आपल्याला दिसणार आहेत. ह्या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री चमकणार आहे ती म्हणजे “प्रार्थना बेहेरे”. आता ह्या दोन दोन नायिका चित्रपटात कोणत्या नात्याने वावरणार आहेत हे कळण्यासाठी ११ जानेवारीला पहिल्याच दिवशी पहिला शो बघून खात्री करून घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे कुटुंबासमवेत पाहायला हरकत नसावी. कविता लाड ही रंगभूमी आणि सिनेमा ह्या दोन्हीमध्ये  काम करणारी अनुभवी अभिनेत्री असल्यामुळे तिचा सहज अभिनय  हा निश्चितच दर्जेदार असणार ह्यात शंका नाही. आणि ती खूप मोठ्या विश्रांती नंतर पुन्हा हा चित्रपट करते आहे म्हणून सगळे सिने रसिक उत्सुक असणार.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author