काय झालं कळंना’ हा प्रेम कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होतोय २० जुलै रोजी

काय झालं कळंना’ हा प्रेम कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होतोय २० जुलै रोजी

“प्रेम म्हणजे.. प्रेम म्हणजे.. प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं” पाडगावकरांच्या म्हणण्यानुसार हे असं जरी असलं, तरी प्रत्येकाची ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आणि प्रेमात असताना आयुष्याचे निर्णय घेण्याची कुशलता वेगवेगळी असू शकते. ‘काय झालं कळंना’ हा हि चित्रपट एक प्रेम कथा घेऊन आलेला आहे, पण    या चित्रपटात दाखविलेलं प्रेम म्हणजे फक्त शारीरिक जवळीक किंवा मानसिक जवळीक नसून, आपल्या प्रेमाच्या माणसाच्या सुखात सुख बघणं म्हणजे असलेलं प्रेम आहे. याच मुद्द्यावर बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुचिता शब्बीर सांगतात कि, प्रियकर प्रियसीमधील प्रेम हे आपल्या जागी असतं, पण त्याच बरोबर आई वडिलांवर हि प्रत्येकाने प्रेम करायला हवं, त्यांचा सन्मान करायला हवा, असा सामाजिक संदेश हा चित्रपट देतो.

शरद आणि पल्लवी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्याचं वर्णन करताना गीतकार माधुरी अशिरघडे असं लिहिते कि..

मन सैरभैर झालं…
नाव आठवंना झालं…
ध्यान कुठं लागंना…
काय झालं कळंना…

तहान भूख हरपली

जीव होई वर खाली

काम धाम जमना

काय झालं कळना

 

अशा मनोवस्थेतून एकदा तरी प्रत्येक माणूस गेलेलाच असतो. ती हवीहवीशी वाटणारी गुलाबी स्वप्नं सगळ्यांनाच खुणावत असतात. पण प्रेम करायचं असेल तर त्याला हि काहीतरी किंमत मोजावी लागते. मग हि किंमत तुमची नाती असू शकतील, तुमचं मानसिक स्वास्थ्य असु शकेल किंवा मग तुमचा जीव. प्रेमात जोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू असतं, तेव्हा प्रेम करणारे एका वेगळ्याच दुनियेत वावरत असतात. पण जेव्हा परिस्थिती पालटते तेव्हा आयुष्याच्या खऱ्या सत्याशी त्यांचा सामना होतो. आणि तेव्हा घेतलेले निर्णय एखाद्याचे आयुष्य उध्वस्थ करू शकतात किंवा आयुष्य मार्गी हि लावू शकतात. अशाच आशयाचा हा चित्रपट आहे.

श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनचे पंकज गुप्ता यांनी ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाची निर्मिती केलेली असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन सुचित्रा शब्बीर याचं आहे.   चित्रपटाची पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची असून, संवादलेखन केलंय राहुल मोरे यांनी, तर चित्रपटाची गीते लिहीली आहेत माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी. तसेच संगीत दिग्दर्शन केलंय पंकज पडघन यांनी. तर गीतांना स्वरबद्ध केलेलं आहे आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे या दिग्गज गायकांनी. चित्रपटात नृत्य दिग्दर्शन केलंय सुजीत कुमार यांनी, तर छायाचित्रण केलंय सुरेश देशमाने यांनी. संकलन केलंय राजेश राव यांनी तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. तर अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे आदी कलाकारांच्या ही चांगल्या भूमिका आपल्याला यात पहायला मिळतील.

        मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.