ह्या कलाकाराने घेतली आयुष्याच्या रंगमंचावरून एक्सिट.

हसवणुकीचा खळाळणारा धबधबा आटला. ह्या कलाकाराने घेतली आयुष्याच्या रंगमंचावरून एक्सिट.

रंगमंचावर एखादा अफलातून विनोदी कलाकार आपली कला सादर करत असतो तेंव्हा. अचूक शब्दफेक, चेहेऱ्याचे बदलणारे भाव आणि त्याच बरोबर शरीराची होणारी झटपट हलचाल. त्यातून फुलतात निखळ हास्याचे धबधबे. किशोर प्रधान हे नाव देखील विनोदाच्या दुनियेतील एक खास नाव होते. समोर बसलेल्या प्रेक्षकांना सुरुवाती पासून , शेवटपर्यंत हसत ठेवायचं म्हणजे काय चेष्टा आहे काय? पण किशोरजी अगदी असेच अवलिया होते. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द, आणि चेहेऱ्यावरचे भाव हास्याची कारंजी निर्माण करणारे असायचे. निरागस चेहेरा, पण बोलायला लागला की हसू आवरता येणं कठीण. आयुष्यभर फक्त लोकांना हसवणे एवढंच काम ह्या कलाकाराने केलं.

नागपूरला जन्मलेल्या किशोरजींना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आई मालतीबाई प्रधान ह्यांच्या प्रोत्साहनामुळे ह्या क्षेत्रात पाऊल टाकणेही त्यांना सोपे झाले. शिक्षण पूर्ण करून, मास्टर्सची पदवी घेऊन मगच ते नाट्यक्षेत्रात उतरले. अनेक नाटके आणि बालनाट्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. ग्लाक्सो कंपनीत काम करता करता सुद्धा स्वतःची हौशी नाट्यसंस्था त्यांनी काढली. इतकेच काय तर अनेक इंग्रजी नाटकातही त्यांनी आपली कला सादर केली आहे.

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

किशोरजींनी असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली ती सगळी विनोदीच. त्यांची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे ‘जब वी मेट’ ह्या चित्रपटातला त्यांनी साकारलेला स्टेशन मास्तर. त्यानंतर लालबाग परळ, शिक्षणाच्या आयचा घो, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, ह्या गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या अफलातून भूमिका पाहायला मिळाल्या. हे अभिनयाचं अंग त्यांना त्यांच्या आईमुळेच लाभलं, कारण त्यांची आई रंगभूमीवर अनेक नाटकात कामे करायची. किशोर प्रधान मूळचे नागपूरचे असले तरी, सिनेमा मुळे मात्र मुंबईकर झाले होते. आज हा दिग्गज हास्य कलाकार आपल्यात नाही. ही बातमी खरी न वाटणारी अशीच आहे. पण सत्य आहे की खळाळणारा हा हास्याचा धबधबा आज आटला आहे. यापुढे आपल्याला “किशोर प्रधानी” हास्य कधीच अनुभवता येणार नाही…. ह्या दिग्गज हास्य कलाकाराला फिल्मीभोंगा कडून “भावपूर्ण श्रद्धांजली”.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author