१७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

१७ रात्रीत शूट केलेला  सत्यपरिस्थितीवर  आधारलेला, एक थरार चित्रपट. 

 

“कृतांत” हा नवा कोरा चित्रपट येतोय १८ जानेवारीला, वेगळाच विषय, वेगळाच थरार, अनुभवायला तयार राहा बरं का. मालवणच्या निसर्गरम्य परिसरात शूट केलेला हा चित्रपट आपल्याला काय वेगळं देणार हे पहायचंय. कारण बऱ्याच अंधाऱ्या रात्रीचं हे शूटिंग आहे . म्हणजे नक्कीच काहीतरी थरार असणार हे निश्चित. पण भूत पिशाच्च वगैरे असलं काही नसणार.  सध्याचं धावपळीचं जीवन, आणि जीवनाचं तत्वज्ञान ह्याची सांगड घालणारं, जीवनाविषयी काहीतरी मौलिक सांगणारं कथानक आहे असं एकूण ट्रेलर बघितल्यावर लक्षात येतं. कौतुकाची गोष्ट अशी की अवघ्या १७ दिवसात, खरे तर रात्रीत ह्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

डोंबिवली फास्ट चा हीरो “संदीप कुलकर्णी” ची मध्यवर्ती भूमिका ह्या चित्रपटात आहे. कायमच हटके भूमिका करणाऱ्या संदीपची ह्यातही एक वेगळ्या प्रकारची भूमिका आहे ही , त्यांचा गेटअप सुद्धा खूप वेगळा आहे,  वेगळ्या  ढंगाची भाषा, लहेजा, असं सगळं  वेगळेपण आहे. चित्रपटाचा हीरो आहे सुयोग गोऱ्हे. तरुण उमदा नायक म्हणून चांगला वाटतो. आता ह्यातला थरार काय आहे ते चित्रपटगृहात बघायला जास्त माजा येईल. ह्या दोघांबरोबर आणखी सायली पाटील,  विद्या करंजीकर, आणि वैष्णवी पटवर्धन ह्या अभिनेत्रींनी स्त्री पात्रं रंगवली आहेत. अशा नवीन जुन्या कलाकारांची केमिस्ट्री चांगली जुळून येईल ह्यात शंका नाही.

निसर्गरम्य परिसर असल्यामुळे सभोवतालचं वातावरण मनाला भुरळ घालणारं आहे. हिरवी शेतं, त्यातून जाणारे लांबच लांब रस्ते, स्वच्छ निळाशार समुद्र, शांsssत परिसर, मुंबई पुण्याच्या लोकांना वेड लावणारं प्रदूषण विरहित मोहमयी वातावरण. पण सगळा थरार ह्याच मोहमयी पण गूढ वातावरणात घडतोय. अंगावर काटा उभा करणारा थरार.  मग ह्या थरारातून जीवनाचं तत्वज्ञान कसं समजणार? हा प्रश्न उभा राहतो. पण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला १८ जानेवारी पर्यंत थोडं थांबायला लागणार आहे आपल्याला. ह्या चित्रपटाला गुरू ठाकूर यांचं संगीत आहे, दिग्दर्शन  दत्ता मोहन भंडारे यांचं आहे, निर्माते मिहिर शाह आहेत. एक चांगली कलाकृती म्हणून अनेकांनी ट्रेलर पाहून पसंती कळवली आहे. जर ट्रेलरच इतका पॉवरफुल असेल तर चित्रपट सुद्धा भन्नाट असणारच..!! तर मंडळी तुम्ही ही हा चित्रपट बघून आम्हाला तुमचे अभिप्राय नक्की कळवा..

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author