‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

गेल्या ८ वर्षांपासून रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनुभव असलेला क्षितीश दाते आगामी बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत क्षितीशने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे नटवर्य केशवराव दाते, दिग्दर्शनाचे गणपतराव बोडस पारितोषिक पटकावलेले आहे. तसेच योगेश सोमण दिग्दर्शित ‘माझं भिरभिर’ या चित्रपटातून तो चमकला आहे, तर ‘देवा शप्पथ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘मुळशी पॅटर्न’हा चित्रपट येत्या शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘मुळशी पॅटर्न’ विषयी बोलताना क्षितीश दाते म्हणाला की, “दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मला एक मोठी भूमिका आहे पण तुझ्यापठडीपेक्षा थोडी वेगळी आहे, करशील का? अशी विचारणा केली. प्रवीण तरडे यांचे यापूर्वीचे चित्रपट, नाटकं, एकांकिका मी बघितल्या होत्या त्यामुळे एक कलाकार म्हणून प्रवीण तरडे यांच्यासोबत काम करणे ही सुवर्णसंधी स्वतःहून माझ्याकडे चालून आली होती.  मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला.’’

 

READ ALSO : विठ्ठल नामाचा गजर श्रेयसच्या मुखी

चित्रपटाचे शुटिंग साधारण ४० दिवस सुरू होते. यात माझे सर्वाधिक सीन्स हे ओम भूतकर बरोबर आहेत. ओम आणि मी जुने मित्र. आम्ही एका नाटकात एकत्र कामसुद्धा केले आहे. ‘मुळशी पॅटर्न’मध्ये मी त्याच्या एकदम जिगरी मित्राची भूमिका बजावत आहे. आमची मैत्रीच मुळात अतिशय चांगली असल्याने पडद्यावरपण आमच्यातील केमेस्ट्री खुलून दिसते. या चित्रपटात काम करताना मला बरीच तयारी करावी लागली, त्यात प्रामुख्याने मी काम केले ते माझ्या भाषेवर. माझी भाषा मुळात फार सौम्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बोलली जाणारी भाषा आणि तिचा लेहजा मी अंगिकारला. त्यातून मला माझा अभिनय करणे अधिक सुकर गेले.

‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने मला अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांची अभिनयाची बैठक, बारकावे, कामाच्या बाबतीत फोकस्ड असणे अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या.‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा माझ्यासाठी खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव होता”

चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलताना क्षितीश म्हणाला, शेती हा विषय माझ्या जवळचा नसला तरी त्यातील समस्या किमान माहिती आहेत. तसेच आपल्या शहरांमध्ये काय घडतंय, शहरे आकारहीन कशी काय बनत चालली आहेत या विषयी आपण नेहमी बोलतो यामुळे त्याबद्दल थोडीफार माहिती होती, शुटींग सुरु करण्यापूर्वी प्रवीण तरडे यांनी विषयाची पूर्वकल्पना दिल्याने मला अधिक चांगले काम करता आले. मला

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...