बघा संपूर्ण कुलकर्णी कुटुंब कसे देणार धप्पा..!!

पारंपरिक व्यवसायाची सुरुवात सिनेसृष्टीत देखील सुरू होतेय..!! बघा संपूर्ण कुलकर्णी कुटुंब कसे देणार धप्पा..!!

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झालेल्या या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांची आहे हा सुद्धा एक वेगळा योग ‘धप्पा’ चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे, तसेच ते या चित्रपटाशी अभिनेते आणि सहनिर्माते अशा भूमिकेने जोडले गेले आहेत आणि ह्या सिनेमाचे वैशिष्ट्य असे की संपूर्ण कुलकर्णी कुटुंब ह्या सिनेमात आपली अदाकारी दाखवणार आहे. हा दुर्मिळ योगायोग आगामी ‘धप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमाने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी वृषाली आणि कन्या शारवी असे संपूर्ण कुलकर्णी कुटुंब एकत्र दिसणार आहेत.

 

READ ALSO :  मराठी ताऱ्यांचे ‘कृष्णधवल’ फोटोशूट…!

राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण अशा सुंदर विषयावरील ‘धप्पा’ ह्या सिनेमा मध्ये शारवी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सध्या स्कॉटलंड मध्ये बायो मेडिकल सायन्सचे शिक्षण घेत असलेल्या शारवीने यापूर्वी ‘वळू’, ‘विहीर’ व ‘देऊळ’ चित्रपटात बालकलाकार म्हणून यापूर्वीही काम केले तसेच सुमित्रा भावे यांच्या ‘आजी शरण येते’ या टेलीव्हीजनपटातही बालकलाकार म्हणून चमकली आहे. वृषाली कुलकर्णी या प्रथितयश डॉक्टर असून छंद म्हणून अभिनय करतात. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळविणाऱ्या वृषाली यांनी ‘हायवे’, ‘बापजन्म’, तसेच आगामी ‘अश्लील ऊद्योग मित्रमंडळ’ या चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. ‘हायवे’ चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. ‘धप्पा’ मध्ये त्या एका संवेदनशील लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर गिरीश कुलकर्णी यांची व्यक्तीरेखा ही आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीर उभे राहणाऱ्या आणि जगाशी झुंजायचे बळ देणाऱ्या वडिलांची आहे. या चित्रपटात कुलकर्णी कुटुंब एकत्र दिसणार असले तरी ते कथेमध्ये मात्र वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्तिरेखा आहेत. ‘धप्पा’ या चित्रपटाचे निर्माते सुमतीलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत.

आपल्या देशात अनेक पारंपारिक उद्योग, व्यवसाय क्षेत्रामध्ये संपूर्ण कुटुंब कार्यरत असल्याचे दिसते. याला चित्रपट क्षेत्र सुद्धा अपवाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय सिनेमा क्षेत्रात रंगले आहेत. मात्र संपूर्ण कुटुंब एकाच सिनेमात काम करत आहे, असे दिसत नाही. मात्र कुलकर्णी कुटुंबीय ही समजूत मोडून काढत आपल्याला धप्पा देणार आहेत. तर मंडळी येत्या १ फ्रेब्रुवारी रोजी कुलकर्णी कुटुंबीयांचा धप्पा बघायला विसरू नका..!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author