11 मे ला म्हणा लग्न मुबारक

11 मे ला म्हणा लग्न मुबारक

जेव्हा एखादी कट्टर मुस्लिम मुलगी शिवरायांचा भक्त असणाऱ्या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा काय होतं? त्यांच्या प्रेमाचं आणि त्यांच्या समाजाचंही, त्यांच्या प्रेमाचे राजकीय परिणाम काय होतात, जेव्हा त्यांना धर्म आणि प्रेम यांमधील एक गोष्ट निवडायला सांगितली जाते तेव्हा ते काय निवडतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 11 मे ला लग्न मुबारक या चित्रपटात मिळतील.

लग्न मुबारक चे टीझर

राजकीय रागरंग असणारी प्रेमकथा असं या चित्रपटाचं वर्णन अतिशय चपखल बसेल. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यातील प्रेम संबंध आणि आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव दर्शविणारा असा हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता. नुकताच चित्रपटाचा दुसरा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत तर अभय पाठव प्रॉडक्शन्स सहप्रस्तुत करत आहेत. आरव प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. टीझर मध्येच विषय उलगडावा म्हणून दिग्दर्शकांनी काही शायरींचा वापर केला आहे.

‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ , ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा दमदार शायरीमुळे टीझर हिट झाला आहे. पहिल्या टीझर मध्ये प्रार्थना बेहेरे मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसते. तर सध्याच्या नवीन टीझर मध्ये संस्कृती बालगुडे आपल्याला धडाकेबाज मराठमोळ्या वेशात दिसून येते.

लग्न मुबारक मधील कलाकार

सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी लग्न मुबारक हा आगामी चित्रपट सहनिर्माते आहेत. अभय पाठक आणि अजिंक्य जाधव आपल्यासाठी हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. लग्न मुबारक या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक या जोडगोळीने केले आहे. लग्न मुबारक मध्ये आपल्याला ज्वलंत असा जातीयवाद दाखविला गेला आहे. दोन्ही वेगवेगळ्या धर्माच्या असलेल्या प्रेमी युगुलाच्या पार्श्वभूमीवर अनेक जातीय वाद उद्भवतात. या चित्रपटात संजय जाधव, प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे,  वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे असे अनेक जुने आणि नवीन चेहरे दिसतील. त्यांना प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड यांची साथ लाभेल. या चित्रपटात मराठी बिग बॉस आणि अभिनेते महेश मांजरेकर विशेष भूमिकेत आपल्या भेटीस येणार आहेत.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."