एका कुटुंबाची गोड गोष्ट..

घर एक स्वप्न, एक अभिलाषा, प्रत्येक व्यक्ति त्याच्या आयुष्यात एक आपुलकीच ठिकाण, घर चार भिंती नी नाही तर, नात्याने बनते. अशाच एका गोड घराची गोष्ट घेऊन येत आहे. स्टार प्रवाह “ललित 205”. येत्या 6 ऑगस्ट 2018 पासून रात्री 8:30 वा. सोमवार ते शुक्रवार. ह्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॉडक्शन यांनी केली आहे. या मालिकेद्वारे अभिनेता आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम मालिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. ह्या मालिकेची खासियत म्हणजे ही मालिका एकत्र कुटुंब पद्धती व नाते संबंध यावर आधारित आहे. ही मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार.

या मालिकेद्वारे सुहास जोशी बर्‍याच कालावधीनंतर पुन्हा टेलिविजन वर आगमन करत आहे. सुहास जोशी यांची ह्या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. नात्यांची गोडी या मालिकेद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या स्वतंत्र कुटुंब व्यवस्था त्यामुळे नात्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. घर हे नात्याने बनते. जर घरात नातेवाईक नसतील तर त्या घराला काहीच घरपन मिळत नाही. ही मालिका नक्कीच पुन्हा जुन्या आठवणी ताज्या करणार आहे. आणि पुन्हा प्रेक्षक एकत्र कुटुंब पद्धती कडे आश्वस्त होऊन बघतिल.

सोहम बांदेकर याचे निर्मित क्षेत्रातील पदार्पण नक्की काही तरी नवीन घेऊन येणार याची खात्री वाटते. सुहास जोशी बरोबर या मालिकेत संग्राम समेळ याची प्रमुख भूमिका आहे, संग्राम सोबत अमृता ही टेलिविजन वर नवीन जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच सागर तालशिकार, यांच्या भूमिका आहेत.

नात्यांची एक सुरेल मैफल आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरात नको नुसती माणसे, तिथे असावेत प्रेमळ हसने.. चला तर मग सोमवार ते शुक्रवार नचुकता बघु या रात्री 8:30 वाजता ” ललित 205″

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...