‘Land १८५७’ होतोय उद्या प्रदर्शित

‘Land १८५७’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

नाणार प्रकल्प: जमीन घोटाळा प्रकरण ताजं असतानाच अशाच विषयावर एक चित्रपट येत्या ८ जून रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे, ज्याचं नाव आहे ‘Land १८५७’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

         ‘चुंबलैंड’ या गावाच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग होणार आहे, अशी माहिती गावातील लोकांना कळताच गावकरी प्रचंड खुश होतात. आता आपल्याला आपल्या जमिनीच्या बदल्यात किती पैसा मिळेल?  मग येणाऱ्या पैशांचं काय करायचं ? या विचारात गावकरी गर्क झालेले असतात. पण गावातील २ बेरकी माणसांना या महामार्गाबद्दल आधीच माहित असल्याने ते गावकऱ्यांच्या जमीनी हडप करण्याच्या मागे लागलेले असतात. त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतोय हे तर चित्रपट पाहिल्यावरच आपल्या लक्षात येईल. पण वस्तुस्थितीवर आणि लोकांच्या मानसिकतेवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल, इतकं मात्र नक्की.

विजयालक्ष्मी जाधव यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुधीर कसबे यांनी केलेलं आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटात सव्वाशेहून अधिक कलाकारांनी काम केलेलं आहे. ग्रामीण बाज असलेल्या या सिनेमात २ गाणी आहेत त्यातील एक गाणं ‘आलाय गुलाबराव’ हे youtubeवर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. सत्ताधारी, सत्तेचा घेतलेला गैरफायदा, सामान्य मानसं, त्यांच्या भोळेपणाचे नुकसान, गुंडगिरी, आर्थिक घोटाळे अशा सर्वच बाबींना हा सिनेमा स्पर्शून जातो. चित्रपट हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. या माध्यमाचा ‘जमीन गैरव्यवहारासारख्या’ मुद्द्याबद्दल लोकांना जागृत करण्याचा आणि त्यांच्यामध्ये लढण्याचं सामर्थ्य तयार करण्याचा केला गेलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे असं म्हणायला हरकत नाही.

          या चित्रपटात जयंत सावरकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, आदित्य जाधव, पार्थ जाधव, रुपाली कृष्णराव, मानिणी दुर्गे, विश्वास सकट, रामचंद्र धुमाळ यांनी अभिनयाची धुरा सांभाळलेली आहे. या चित्रपटाचं छायांकन केलंय मंजुनाथ नायक यांनी, तर पार्श्वसंगीत दिलंय रोहित नागभिडे यांनी, चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्द केलंय पंकज पडघम आणि अभिजित बारटक्के यांनी, तर गीतकार आहेत वलय मुलगुंद आणि विनायक पवार. या चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज चढवलाय आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर यांनी. तसेच या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत युवराज कुंभार. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.