लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ प्रदर्शनाच्या मार्गावर

लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ प्रदर्शनाच्या मार्गावर

           राज्य पुरस्कार प्राप्त रेडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रिंगण यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी‘ हा नवीन चित्रपट २७ जुलै २०१८ ला  प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सने आता पर्यंत ५ मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. ज्यात सांगतो ऐका, वजनदार, गच्ची या चित्रपटांचा समावेश आहे. ‘पिप्सी’ हा चित्रपट लॅन्डमार्क फिल्म्सचा सहावा चित्रपट आहे.

            चानी आणि बाळू या दोन ८ वर्षांच्या निरागस मुलांच्या जिद्दीची, त्यांच्या कल्पक बुद्धीची आणि समाजातल्या भीषण वास्तवाची सूचक मांडणी ‘पिप्सी’ या चित्रपटात केलेली आहे. परीकथेतील राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो अन माणसांचा जीव मास्यांमध्ये असतो, अशा भोळ्या समजुतीने, चानी आणि बाळू, चानीच्या आईचा जीव ज्या मास्यामध्ये आहे, तो मासा शोधायला निघतात. दुष्काळामुळे जिथे पाणीच नाही तिथे मासे कसे असतील? याप्रकारचे सूचक संदर्भ चित्रपटात वापरले गेलेले आहेत.

चित्रपटाच्या टीझरमध्ये एका दृश्यात बाळू कालव्यातून चालत असल्याचं दाखवलंय, तर चानी कालव्यावर बांधलेल्या बंधाऱ्यावर चालत असताना दिसते. बाळू तिला म्हणतो कि, “पाणी आहे कुठे ! तरी घाबरते…” दिग्दर्शक इथे सुचवत आहे कि त्या मुलाला या गोष्टीचा अंदाज आहे कि या कालव्याला या आधी कधीही पाणी न्हवतं..आता ही नाही.. तरी हि बाळूच्या मते चानी घाबरत आहे. त्यावर चानी उत्तर देत म्हणते कि, “तिकडनं आलं ना पटकन पाणी.. वाहून जाशील…” यात चानीचा प्रचंड विश्वास दिसतो कि पाणी कधी हि येऊ शकतं, कारण पाणी वाहून नेण्यासाठीच हा कालवा बांधलेला आहे. त्यावर बाळू चिडून म्हणतो कि, “असं कधी येतं का पाणी..? येड !” या वाक्यात बाळूचा फाजील पण पाणी न येण्यामागचा दाट विश्वास दिसतो, कारण त्याने या आधी त्या कालव्यात असं पाणी येताना पाहिलेलं नाही. अशा रीतीने कथेला निरागसतेचा मुलामा देऊन अतिशय महत्वाच्या मुद्द्यांना दिग्दर्शक हाथ घालू इच्छितात.

दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा चित्रपट राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.ई या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तसेच यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली होती. तसेच गतवर्षीच्या मामी महोत्सवात आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बाल आणि तरुण वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या यादीतही ‘पिप्सी’ चित्रपटाने स्थान मिळवलं होतं. इतकेच नव्हे तर, आगामी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हि ‘पिप्सी’ चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला आहे.

या चित्रपटात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मैथिली पटवर्धनला ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटाचं लेखन केलंय सौरभ भावे यांनी आणि दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे रोहन देशपांडे यांनी. कला दिग्दर्शन केलंय मधुकर कांबळे यांनी, तर गीत लेखन केलंय ओमकार कुलकर्णी यांनी.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.