लतादीदींचे: आता विसाव्याचे क्षण

लतादीदींचे: आता विसाव्याचे क्षण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ज्यांना भारताची गानकोकिळा असंही म्हटलं जातं. ज्यांनी आजवर भारतीय चित्रपटसृष्टीला असंख्य अजरामर गाणी दिली. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून त्यांच्या गाण्यांनी सर्वच रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘धुंद मधुमती रात रे नाथ रे’ हे गाणे एका जुन्या चित्रपटातील असले तरीही ते आजही आपण तितक्याच तल्लीनतेने ऐकू शकतो.

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.’ ‘चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा    खंत करी काही केल्या फुलेना, गेले    ‘आंब्याच्या’ बनी म्हंटली मैनांसवें गाणी आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे’ रुसव्या फुगव्यात अगदी सहजपणे ओठावर येणारी अशी ही त्यांची काही गाणी. लता मंगेशकर यांच्या आवाजातील जादू आपल्याला त्यांच्या प्रत्येक गाण्यातून अनुभवायला मिळते.

‘उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा    गजमुख ऋद्धि-सिद्धिचा नायक,सुखदायक भक्तांसी ‘ बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, चिमणी मैना, चिमणा रावा, चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा.’ एका सुरेल भातुकलीच्या खेळाची आठवण करून देत हे गाणे.  त्यांचे प्रत्येक गाणे हे लोकप्रियच आहे.

‘मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली, ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’, ‘लटपट लटपट लटपट लटपट, तुझ चालणं गं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं गं मंजुळ मैनेचं, नारी गं, नारी गं’, ‘घन ओथंबून येती बनात राघू ओघिरती पंखावरती सर ओघळती झाडातुनी झडझडती’.  अशा बऱ्याच गाण्यांनी आपण दिवसाची सुरुवात करत असतो.

लता मंगेशकर भारताला लाभलेलं एक वरदान म्हणता येईल कारण असा आवाज पुन्हा होणे नाही. त्यांचा सुमधुर आवाज त्यांनी इतक्या वर्ष जपला आहे हेसुद्धा एक आश्चर्यच म्हणायला हवं. नुकतेच लतादीदींच्या आवाजात एका गाण्याचे रेकोर्डिंग करण्यात आले. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं त्यांच्या वयाच्या ८९ व्या वर्षी ध्वनिमुद्रित करण्यात आले. ‘यापुढे काहीच रेकोर्डिंग करणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. हे गाणे ऐकल्यावर त्यांनी व्यक्त केलेली निरोपाची भावना खूप अस्वस्थ करणारी आहे. विलक्षण आर्तता, अतिशय जड अंत:करणाने दिलेला निरोप, विरहाची भावना, यात व्यक्त होते. शब्द अपुरे पडतात अशा भावना यात व्यक्त केल्या आहेत. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेले हे गाणे आहे.

हे गाणं ऐकून नकळतच त्यांचे एक अजरामर गाणे अलगद ओठावर रुंजी घालू लागतं….

‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज़ ही, पहचान है,गर याद रहे’

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author