धावत्या जगात मागे पडलेल्या कामगाराचं भावविश्व उलगडणारा “लेथ जोशी” येतोय १३ जुलै रोजी

धावत्या जगात मागे पडलेल्या कामगाराचं भावविश्व उलगडणारा “लेथ जोशी” येतोय १३ जुलै रोजी

आजकालच्या जगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, प्रगत होत आहे. कंपनींचे मालक कामगारांपेक्षा यंत्रांवरच जास्त विश्वास ठेवत आहेत. कारण १०-१० माणसांचं काम एकच यंत्र न थकता रात्रंदिवस करू लागलं आहे. अशा वातावरणात टिकून राहायचं असेल तर काळानुसार बदललंच पाहिजे. जे बदलत नाहीत ते हद्दपार केले जातात. अशाच स्वतःला परिस्थितीनुरूप बदलू न शकणाऱ्या, पण आपल्या कामावर खूप प्रेम करणाऱ्या  एका कामगाराची कथा घेऊन ‘लेथ जोशी’ हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

वयाची ३५ वर्षे लेथ मशीनवर टर्नरचं काम करून पोट भरणाऱ्या जोशींना त्यांच्या कंपनीतून डच्चू दिला जातो. त्यावेळी जगण्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी जोशी स्वतःची लेथ मशीन घेऊन पुन्हा त्याच पारंपारिक पद्धतीने पैसा कमविण्याचा प्रयत्न करू इच्छितात. या प्रवासात त्यांना कराव्या लागणाऱ्या आर्थिक, भावनिक आणि कौटुंबिक संघर्षाला दिग्दर्शकाने अतिशय उत्तम रितीने चित्रित केलेलं आहे. सामान्यतः मुलगा वडिलांना व्यवसायासाठी पैसे मागतो, पण या चित्रपटात जोशी आपल्या मुलाला लेथ मशीन घेण्यासाठी पैसे मागतात. त्या दृश्यात एका बापाचे अवघडलेपण सुरेख टिपलं गेलेलं आहे. जोशींचे अल्पसंतुष्ट मित्र हि जोशींना लेथ मशीन न घेण्याचा सल्ला देत असतात. पण जोशी आपल्या मित्रांसारखे परिस्थितीसमोर हार मानू इच्छित नाहीत. जोशी जिद्दीने लेथ मशीन खरेदी करण्याची धडपड करतच राहतात. या धडपडीत जोशी यशस्वी होतात कि नाही? हे तर चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळेल. पण एक गोष्ट मात्र चित्रपटाच्या टीझरमध्ये सारखी जाणवत राहते ती म्हणजे, ३५ वर्ष ज्या लेथ मशीनच्या सानिध्यात जोशींनी घालवली, त्या लेथ मशीनमध्ये जोशींचा जीव गुंतलेला आहे. प्रचंड प्रेमाशिवाय इतकी धडपड कोणीही कोणत्या हि गोष्टीसाठी करत नाही. हा चित्रपट म्हणजे जोशींची लेथ मशीनसोबत असलेली लव स्टोरीच आहे म्हणा ना!

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे. लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अमोल लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून, सोनाली जोशी आणि मंगेश जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे मंगेश जोशी यांनी. तर छायांकन केलंय सत्यजित श्रीराम यांनी, तसेच संकलनाची जबाबदारी पार पडली आहे मकरंद डंभारे यांनी. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी,  सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

          मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमतीं जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.