म्हातारपण वगैरे काही नसतं, लव्ह यु जिंदगी म्हणत शतदा प्रेम करायचं असतं..!!

“अहो आजोबा, काही मदत करू का..?” “काका, तुम्ही आत्ता इतके छान आहात तर तरुणपणी किती स्मार्ट असाल नाही?” अशा प्रश्नांवर कित्ती आनंद व्हायला पाहिजे नाही..?? कोणीतरी मदत करतंय, कोणीतरी मान देतंय.. पण छे हो.. अनिरुद्ध दाते हातात मिळेल ते अंगावर फेकून मारतील, जर तुम्ही त्यांना असले प्रश्न विचारलेत तर.. 

“अय्या खरंच..?” 

“नाही म्हणजे खरोखर मारणार नाहीत. वय झालंय ना त्यांचं. पण निदान तुमच्या कडे बघून खाऊ की गिळू असे एक्सप्रेशन्स तर नक्कीच देतील हो.” “त्यांच्या मित्रांच्यातली कुजबुज ऐकलीये”

“काय काय..?” “मोठ्ठा रोग झालाय म्हणे त्यांना.. ‘म्हातारपण’ आलंय” “अय्या हो…? पण हा रोग कुठे आहे. सगळ्यांनाच येत ते” “अहम अहम.. काय बोलताय मुलांनो?” अहो अनिरुद्ध काका तुमच्या म्हातारपणाविषयी गहन चर्चा करतोय आम्ही.. ” काय..? कारट्यांनो पळा इथून नाहीतर हाणतोच एकेकाला..” “अहोsss चिडायला काय झालं?” “अगं कालची पोरं मला म्हातारा म्हणतायत. पळवून लावलं त्यांना.” “इश्य, आता बीपी, डायबेटीस सगळं असताना कशाला एवढी चिडचिड करायची? आलं तर आलं म्हातारपण” ” पण मी म्हातारा नाहीये..! बघच तू आता कसा पुन्हा ‘तरणाबांड’ होऊन दाखवतो” “अहो ऐका तरी” 

अनिरुद्ध दातेच काय तर घरो घरी मोठा चिंतेचा विषय असतो हा.. ‘वय होतंय’, ‘वय वाढतंय’, ‘म्हातारपण’ कुण्णा.. कुण्णाला नको आहे हो हे. पण आमच्या अनिरुद्ध काकांच्या आयुष्यात मात्र एक परी येणार हो. सुंदर परी..!! मग कसं तरंगणार पहा ते म्हातारं उप्स म्हणजे अनिरुद्ध काका हो… परी येणार गोड गोड बोलणार.. परी येणार आणि अनिरुद्ध काकाचा ‘अनि बॉय’ करणार. ‘ओह यु ओल्ड मॅन’ चा ‘ओह अनि बेबी’ लवकरच होणार.. कसं काय म्हणजे?? केस काळे होणार, जिम मध्ये जाऊन ‘इंच लॉस’ की काय म्हणतात ते, नंतर ते जुनाट काका टाईप ऑफिस चे कपडे जाऊन येणार जीन्स आणि टीशर्ट.. त्यावर लेदर जॅकेट, चेन, अंगठ्या, कडं, गॉगल… आणि फटफटी सोडून यो बाईक वरून येणार हा आमचा यो बॉय..!!

 

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

अगोबाई मग दाते काकुंच कसं होणार हो..?? दाते काकू..?? गाय आहेत, त्या गाय.. त्यांचं काहीही वाईट होणार नाही. चांगल्याच ओळखतात त्या, ह्या शतदा ‘ओ बॉय’ होणाऱ्या अनिरुद्ध काकांना..!! म्हणजे..?? म्हणजे बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही ना..?? आणि झालाच तरी ‘दिन का भुला श्याम को घरको वापस आये’.. आहे काय अन नाही काय..!! दाते काकूंनी आमच्या दाते काकांना मुक्त सोडलं आहे. कारण गृहमंत्र्यांच्या हातातच तर असतात सगळ्या नाड्या..!! मग मी काय म्हणते मंडळी..  आमच्या बाजीरावांच्या थाटात काशीबाई आणि मस्तानीबाई ह्या दोन डागरींवर बॅलन्स करणाऱ्या ‘अनिरुद्ध’ काकांना भेटायला या बरं आजच..!! शेवटी काय ‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत सगळ्यांनाच शतदा प्रेम करावंसं वाटतं नाही का..??

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author