लव्ह यु जिंदगी

लव्ह यु जिंदगी

शाहरुख खान आणि आलिया भट्ट चा ‘लव्ह यु जिंदगी’ सिनेमा तुम्ही पहिलाच असेल. आता ह्याच नावाचा सिनेमा मराठीत सुद्धा येतोय. 

काय म्हणालात? ट्रेलर नाही आला? आणि गाणं ही नाही रिलीज झालंय? अगदी खरंय तुमचं म्हणणं. 

मधल्या काळात ‘आमची मुंबई’ नावाचं रिलीज झालेलं गाणं तुम्ही पहिलाच असेल ना..! किती ट्रोल केलं गेलं आपल्या महागुरूंना म्हणजेच सचिन जी पिळगावकारांना. मग आता कदाचित ते ताकही फुंकून पित असतील आणि आधीच बोलबाला करून ट्रोल होण्यापेक्षा त्यांनी सबुरीने चित्रपट रिलीज करण्याकडे लक्ष दिले असावे असे वाटते. कारण ह्या सिनेमा मध्ये लीड रोल त्यांचाच आहे.

आश्चर्यचकित झाला असाल तर थांबा. अजून एक धक्का देतो तुम्हाला सोबतच. ह्या चित्रपटात लिडिंग लेडी आहे कमालीची सुंदर अशी मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. हो..! सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे ह्या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आता हा सिनेमा हिंदी ‘लव्ह यु जिंदगी’ ची मराठीतली आवृत्ती असेल तर आपण नक्कीच समजू शकतो की ह्या चित्रपटाची मुख्य जोडी अशी का असेल..! 

पण ह्या मराठी ‘लव्ह यु जिंदगीची’ टॅग लाईन काही वेगळंच सुचवतेय. तर ही टॅग लाईन अशी आहे की ‘शतदा प्रेम करावे’ आणि ह्यात अनिरुद्ध बाळकृष्ण दाते नावाचे पात्र सचिनजींनी साकारले आहे. पन्नाशीच्या पुढेच असलेले हे पात्र विवाहित आहे. पत्नीच्या भूमिकेत आहे कविता लाड. अजून एक सगळ्यांची अत्यंत लाडकी अभिनेत्री. ह्यांची भट्टी पण जबरा असेल. 

हिंदी लव्ह यु जिंदगी मध्ये शाहरुख खान, तरुण आलिया भट्ट ला मानसोपचारतज्ञ बनून, तिला सरळ रुळावर आणताना दाखवला आहे. तारुण्यात खूप चुका झाल्याने, आजू बाजूच्या परिस्थिला एकंदर खूप वैतागल्याने खूप व्यथित झालेल्या आलिया भट्ट च्या पात्राला परत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाऱ्या अतिशय शांत आणि समजूतदार मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका शाहरुखने साकारलेली आपण पहिली आहे. 

असेच, ह्या मराठी सिनेमात सुद्धा पुन्हा ‘आयुष्यावर प्रेम करायला लावणे’ हाच महत्वाचा मुद्दा आहे पण.. मजेदार ढंगाने.. आणि मानसोपचार तज्ज्ञाकडून नव्हे तर सरळ तारुण्याने भारलेल्या तरुणीसोबत मैत्री करून. ह्या सिनेमाचे टिझर तरी हेच दर्शवते. 

 
 

READ ALSO : जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

टिपिकल वैवाहिक आयुष्याला कंटाळलेला आणि तारुण्यातील जिवंतपणा पुन्हा अनुभवावासा वाटणारा अनिरुद्ध दाते आपल्याला भवताली सुद्धा नक्कीच दिसेल. एक विशिष्ट वय झाल्यावर हताश झालेले स्त्री पुरुष आपण पाहतोच. अनिरुद्ध दाते सुद्धा त्यातीलच एक. बहुदा त्याची मैत्री प्रार्थना बेहेरे च्या तरुण पात्राशी होते आणि तिथून सिनेमा नवीन वळण घेत असावा. लग्न झालेला असल्याने बायकोला काहीही कळू न देता बाहेरच्या बाहेर अनिरुद्धला ‘शतदा प्रेम करायचे’ आहे. तारुण्य पुन्हा अनुभवायचे आहे. आणि निराश होत चाललेली जिंदगी पुन्हा मजेदार बनवायची आहे. 

आता म्हाताऱ्या होत चाललेल्या जीवाला तरुण बनवायचे असेल तर सगळं कसं गुलाबी गुलाबी हवं. प्रार्थना बेहेरे हा गुलाबीपणा ह्या चित्रपटाला नक्कीच बहाल करू शकेल अशी अभिनेत्री आहे. अत्यंत मोहक चेहरा, सुंदर डोळे आणि भारीच गोड हास्य असलेली ही अभिनेत्री पिळगावकारांच्या ‘दाते आजोबा’ बनून बसलेल्या पात्रात पुन्हा जीव फुंकणार हे नक्की. बायको आणि मैत्रीण अशा दोन दगडांवर पाय ठेवताना होणारी मजा देखील ह्या सिनेमात विनोदी प्रसंगात दाखवली जाईल हे नक्की. 

चांगले अभिनेते-अभिनेत्री, हलका फुलके विनोदी प्रसंग आणि तारुण्य परत आणणारे गुलाबी वातावरण ह्या सिनेमात जीव फुंकतील. १४ डिसेंम्बर २०१८ ला प्रदर्शित होणाऱ्या ह्या सिनेमाकडून आपले पुरेपूर मनोरंजन होईल अशी अपेक्षा करूयात. सो मित्रांनो तयार राहा तुम्ही ही ‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत परत आयुष्याच्या प्रेमात पडायला..!! 

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author