रिलीज झालं टायटल ट्रॅक ह्या तूफान विनोदी सिनेमाचं.. बघा किती सितारे चमकलेत ह्यात..!!

रिलीज झालं टायटल ट्रॅक ह्या तूफान विनोदी सिनेमाचं.. बघा किती सितारे चमकलेत ह्यात..!!

मराठी चित्रपट सृष्टी गेल्या दोन वर्षांपासून कात टाकून अगदी ताजी तवानी झाली आहे, हे दोन वर्षात आलेल्या एकापेक्षा एक भन्नाट मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या दणदणीत कमाई वरून आपल्या लक्षात आलं आहे. प्रत्येक चित्रपटाचा गाजण्याचा निष्कर्ष काढला तर काही चित्रपट गाजले मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्यामुळे, काही गाजले उत्कृष्ट कथेमुळे तर काही उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे, तर काही सगळंच भारी असल्या मुळे गाजले, म्हणजे कथा ,पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सगळ्याच गोष्टी भारी असल्यामुळे त्यांना एक चांगला दर्जा मिळाला आणि कमाई सुद्धा उत्कृष्ट झाली. असले सगळेच चित्रपट ह्या दोन वर्षात तयार झाले. त्यामुळे रसिक प्रेक्षकांची जरा तारांबळ उडाली. हा सिनेमा आधी बघावा का तो अशी गडबड होत गेली. काही कलाकार ठरले हुकमी एक्के, तर काही दिग्दर्शक कायम लक्षात राहिले. म्हणून आता मराठी चित्रपटांना खूप गर्दी होताना दिसते आहे. चित्रपट पाहिला की त्याची छाप पडते आता प्रेक्षकांवर.

 

READ ALSO :  उपेंद्र लिमये ‘सूर सपाटा’ मध्ये साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक

असा आणखी एक चित्रपट लवकरच येतोय आपल्या खास मनोरंजनासाठी. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ‘संजय जाधव’. संजय जाधव म्हणजे भन्नाट चित्रपट असं समीकरण झालं आहे गेल्या काही वर्षात, दुनियादारी, मितवा, ह्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन संजय जाधव यांचं असल्यामुळे त्या चित्रपटांची अजूनही छाप रसिक प्रेक्षकांवर आहे. आता जो येणारा सिनेमा आहे ज्याचं दिग्दर्शन संजय जाधव यांचं आहे, आणि त्या चित्रपटाचं नुकतंच टायटल ट्रॅक रिलीज झालंय. हे टायटल ट्रॅक रिलीज झालं पुण्यातल्या एक मॉल मध्ये. आणि ह्या मॉल मध्ये तरुण प्रेक्षकांनी खूपच गर्दी केली होती. म्हणजे टायटल ट्रॅक पासूनच लोकांचं संजय जाधव ह्यांच्यावरच्या प्रेमाचं दर्शन घडलं असं खुद्द संजय जाधव ह्यांनी सांगितलं. ह्या त्यांच्या टायटल ट्रॅक मध्ये तेजस्विनी पंडित, साई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत ह्या दिग्गज कलावंतांची वर्णी लागली आहे. एवढे मोठे दिग्गज कलाकार मराठी सिनेमाच्या टायटल ट्रॅक साठी पहिल्यांदाच एकत्र आले. उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे दोघे येरे येरे पैसा नंतर म्हणजे एक वर्षा नंतर एकत्र आलेत. आणि साई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित ह्या दोघी चार वर्षानंतर एकत्र आल्या. पण ह्या “लकी” ह्या चित्रपटाच्या टायटल ट्रॅक साठी हे सगळे संजय जाधव ह्या ख्यातनाम दिग्दर्शकामुळे एकत्र आले असं हे चौघेही म्हणाले. संजय जाधव यांच्याबरोबर काम करायला मिळालं म्हणून काही सगळेच लकी आहोत.

हे टायटल ट्रॅक गायलंय ह्या चौघांनी मिळून आणि हे ठरणार आहे एक वेगळं आणि अफलातून गाणं. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणार आहेत ‘अभय महाजन’ आणि ‘दीप्ती सती.’ एक वेगळ्या प्रकारचा हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . आणि ह्या टायटल ट्रकची धम्माल काही वेगळीच आहे. नक्कीच पहा म्हणजे ‘लकी’ सिनेमा कसा असेल ह्याची थोडी झलक कळू शकेल.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author