गुलाबजामची चव आवडली का? तर मग वय विचारू नका…

गुलाबजामची चव आवडली का? तर मग वय विचारू नका…

सध्या सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरु आहे ती फक्त वय विचारू नका अशी. त्याला कारण आहे सोनाली कुलकर्णीचा आगामी चित्रपट ‘माधुरी’. या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. सोनाली कुलकर्णी हि अभिनयसंपन्न अशी अभिनेत्री आहे. तिने आजवर साकारलेल्या भूमिका ह्या तिच्या प्रत्येक भूमिकेपेक्षा भिन्न होत्या. तिच्यातील अभिनयकौशल्य हे तिने साकारलेल्या भूमिकेतून स्पष्ठ होत आहे. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचा वेगळा ठसा उमटवला आहे. तिच्यात असलेली अभिनयाची वेगळी झलक प्रेक्षकांना तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेतून कळते.

 

READ ALSO : काय आहे मनमोहनाच्या या राधिकेचं गुपित : आशा काळे

सोनालीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. ‘कोकणस्थ’ मधील आईची भूमिका. त्या भूमिकेला तिने योग्य न्याय दिला. ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील मंद आमटे अगदी हुबेहुब तिने साकारली. कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेत स्वतःला कशा प्रकारे त्यात बसवायचे हे तिने योग्य पद्धतीने जाणले आहे. त्यामुळे तिला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला तिने यशस्वीरीत्या जिवंत केले आहे. ‘अग बाई अरेच्चा २’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी फार उचलून धरले होते. त्याचप्रकारे ‘रिंगा रिंगा’ तील तिची भूमिका अगदी वाखाणण्याजोगी होती. ताकास तूर न लागू देण म्हणजे काय असते हे तिच्या त्या चित्रपटातील अभिनयाने कळते. ती भूमिका गूढ होती आणि तिने ती अगदी त्याच पद्धतीने साकारली. ‘पुणे ५२’ मधील साधी सरळ गृहिणी. गुलाबजाम हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे. योग्य पाकात जसा गुलाबजाम हळूहळू मुरत जाऊन त्याची गोडी वाढवतो तसेच तो तोंडात गेल्यावरदेखील त्याची गोडी हळूहळू वाढवतो. ‘गुलाबजाम’ मधील राधा हि अशीच होती आणि तिने ती अगदी तशीच साकारली.

चित्रपटलेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी चित्रपट चित्रित करतांना कोणतीही व्यक्तिरेखा अति किंवा कमी अशी दाखवली नाही. त्यामुळे चित्रपटाचा समतोल कायम राहतो. या दिवाळीतील अप्रतिम मेजवानी दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिली आहे. डॉ काशिनाथ घाणेकर जर मुख्य भोजन असेल तर इतर पात्रांनी त्यात गोडी वाढवायची कामगिरी केली आहे. भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, मास्टर दत्ताराम, या सर्व व्यक्तिरेखा पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत. आणि याचे सर्व श्रेय जाते ते दिग्दर्शकाला. आणि डॉ काशिनाथ घाणेकर एक अप्रतिम कलाकृती आहे. अशी की जिचा आस्वाद हा ज्याचा त्याने, जेव्हाचा तेव्हाच घेणे आवश्यक आहे. मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक उत्कृष्ट चटकदार मेजवानी आहे.

चित्रपटातील योग्य संगीत व उत्तम छायाचित्रण याच्यामुळे हा चित्रपट 1970 चा काळ योग्य पद्धतीने पडद्यावर उतरवू शकले आहे. एकूणच तांत्रिकदृष्ट्या चित्रपट अप्रतिम आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी एकदा तरी नक्की नक्की पहावा कारण चित्रपट कसा आहे? एकदम कडक…

फिल्मीभोंगा मराठीकडून आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटाला मिळतात एकदम कडक 5 पैकी 5 स्टार

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author