नंदू माधव – देविका दफ्तरदार प्रथमच एकत्र

नंदू माधव – देविका दफ्तरदार प्रथमच एकत्र

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेते नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांवर आपला ठसा उमटवत स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केलेल्या या दोन्ही कलाकारांनी आजपर्यंत एकत्रित काम केलेले नाही, मात्र आता योगायतन फिल्मस् प्रस्तुत ‘परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटात प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह ‘परी हूँ मैं’ या चित्रपटाचे निर्माते आहेत, चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत.

READ ALSO : A NEW FACE IN MARATHI FILM INDUSTRIES

परी हूँ मैं हा चित्रपट टीव्ही मालिका, रियालिटी शो अशा चंदेरी दुनियेतील बालकलाकारां भोवती फिरणारा आहे. या चित्रपटामध्ये नंदू माधव प्रेमळ वडिलांच्या तर देविका शिस्तप्रिय आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर बालकलाकार श्रुती निगडे त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आणि अभिनेत्री फ्लोरा सैनी महत्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे तर अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंब आणि चंदेरी दुनिया या भोवती फिरणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावनिक असा अतिशय वेगळा असलेला ‘परी हूँ मैं’हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटील येत आहे.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author