धकधक गर्ल म्हणून नाव मिरवणारी आपली माधुरी सध्या खूप मोठ्या बातमीमुळे चर्चेत आहे.

धकधक गर्ल म्हणून नाव मिरवणारी आपली माधुरी दीक्षित – नेने सध्या खूप मोठ्या बातमीमुळे चर्चेत आहे.

ती बातमी कोणती ती तुम्हालाही माहीतच असेल.  भाजपा च्या तिकिटावर २०१९ मध्ये माधुरी खासदार म्हणून पुण्यातून उभी राहणार आहे. एवढ्या पक्क्या बातमीनंतर बातमी आली की माधुरीला २०१९ च्या निवडणुकांसाठी लोकसभेवर खासदार म्हणून पुण्यातून तिकीट मिळू शकते. पक्क्या बातमीचे रूपांतर जर तर मध्ये झाले. आणि आता तर खुद्द माधुरी म्हणतीये ह्या अफवाच आहेत.  लक्ष देऊ नका.

त्याचं असं आहे की माधुरीने ऐन भरात डॉक्टर श्रीराम नेनेंशी लग्न करून बॉलिवूड ला गुड बाय केला.  त्यांनतर संसार, मुलं आणि अमेरिकेत रमलेली माधुरी पाच सात वर्षांनी अचानक ‘ आजा नच ले’ सिनेमात झळकली. आणि ह्या मार्फत तिने पुरागमनाची जणू घंटा वाजवली. हा सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर आलेले गुलाब गॅंग, देढ इश्कीया असे वेगळ्या ढंगाचे असले तरी हे सिनेमे देखील फारसे चालले नाहीत. भारतातले काम आणि अमेरिकेत कुटुंब अशी धावपळ झेपेना म्हणून डॉक्टर साहेबांचा डॉक्टरीचा गाशा गुंडाळून ती कुटुंबासहित भारतातच आली. झलक दिखला जा ह्या टीव्ही वरील कार्यक्रमात तिने समीक्षकाची भूमिका बजावली. त्याचे बरेच सिझन केले. पण हाडाची अभिनेत्री असलेल्या माधुरीला पुन्हा सिनेमेच करायचे होते. जे काही तिला मिळत नव्हते.

त्यामुळे ह्या पेज३ कार्यक्रमाला हजेरी लाव, इकडे उदघाटन कर, तिकडे दीप प्रज्वलन कर ह्या पलीकडे तिला जाता येत नव्हते. अशा सगळ्या तापात अडकलेल्या माणसाला नक्कीच नैराश्य येत असणार पण तिने हार मानली नाही. तिच्या नैसर्गिकरित्या लाभलेल्या संपत्तीचा म्हणजेच तिच्या अंगच्या नृत्य कलेचा तिने प्रचार प्रसार करायला नृत्यशाळा उघडली. ह्या ना त्या निमित्ताने माधुरी चर्चेत मात्र राहत होती. अशा परिस्थितीत कोणीही सर्वसाधारण माणूसदेखील राजकारणाकडे वळतो. मग माधुरी तर सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी सौंदर्यवती अभिनेत्री आहे. ती कशी मागे राहील?

 
 

READ ALSO : गोंडस चेहरा असूनही खलनायकी रूपातच का आवडतोय जितेंद्र जोशी?

त्यामुळे तिच्या राजकारणातील प्रवेशाच्या बातम्यांना उधाण आले. रेखा, हेमा मालिनी, सचिन तेंडुलकर, किरण खेर असे दिग्गजच काय तर सिद्धूपाजी सारखे खेळाडू सुद्धा राजकारणापासून दूर नाही राहू शकले. मग माधुरीने राजकारणात प्रवेश करणे काहीच वावगे नाही. खरे तर राजकारणाला पण ग्लॅमर आले असते. त्यातून भाजपातील महत्वाचे, नाही अति महत्वाचे व्यक्ती ‘अमित शहा’ यांच्या सोबत माधुरी आणि श्रीराम नेनेंचे काही फोटो झळकू लागले. दोन तीन दिवसात ते फोटो व्हायरल झाले. अगदी कोणालाही राजकारणात हमखास यश मिळवून देतील अशी प्रचिती देणारे अमित शहा माधुरीला का बरं भेटले असतील ह्या चर्चेला चांगलीच उकळी फुटली. आणि ह्या भेटीचे पर्यावसान ‘माधुरी इलेक्शन ला उभी राहतेय’ ह्या बातमीत झाले. पुण्यातून खासदारकी साठी तिला भाजपा तिकीट देत आहे असेही म्हटले जाऊ लागले. मागचे काही दिवस हीच बातमी चांगली तापत आहे.

आणि शेवटी माधुरीच्या जबाबाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. काही चाहते खुश झाले काही चाहते हिरमुसले. काहींना तिने राजकारणात जाऊन नृत्य अभिनय क्षेत्रासाठी काही करावे असे वाटते तर काहींना पब्लिक स्टंट वाटतो. तिने अजिबात राजकारणाच्या चक्रव्यूहात सापडू नये अशी काळजी वजा तक्रार काही चाहते करतात. पण माधुरीनेही ती राजकारणात जात नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ह्या सगळ्या अफवाच आहेत असेही तिने म्हटले. तिच्या कडे आता सिनेमाचे नवीन प्रोजेक्ट्स हातात आहेत आणि त्यातच ती समाधानी आहे असे ती पुढे म्हणते. हे सगळे ऐकून चाहत्यांच्या जीव नक्कीच भांड्यात पडला आहे. तिच्या येणाऱ्या आगामी चित्रपटांकडे मात्र सगळे आशा लावून बसणार हे नक्की. राजकारण करावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतंय ह्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच असते.

असो आपल्या धकधक गर्लचे आगामी टोटल धमाल आणि कलंक सिनेमासाठी तिला शुभेच्छा देऊ..!!

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author