एन डी स्टुडिओ महामेळा

एन डी स्टुडिओ महामेळा

पर्यटन व्यवसाय हा फायदेशीर असल्यामुळे अनेक प्रकारे उपयोगी आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याचे पर्यटन मंडळ आहे जे त्या त्या राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. अशाच प्रकारे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊन राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी कार्यशील आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने एक महामेळयाचे आयोजन केले आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जत येथे एन.डी.स्टुडिओ असून तेथेच हा महामेळा दिनांक २८एप्रिल ते १मे पर्यंत भरवण्यात आला आहे.

महामेळ्याची वैशिष्ट्ये

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओ मध्ये संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचा ऐवज सामावलेला असल्याने यातून प्रेक्षकांना फक्त हिंदी चित्रपट सृष्टी नाही तर भारतातील विविध चित्रपट सृष्ष्ट्यांच अनुभव घेता येणार आहे. या महामेळ्यात पर्यटकांना विविध चित्रपटांचे सेट पाहायला मिळणार आहेत.

ऐतिहासिक चित्रपटासाठी बांधण्यात आलेल्या राजवाड्यांची, गड किल्ले यांची आणि आलिशान बंगल्याची सफर देखील करता येणार आहे.चित्रपटातील पात्रे बाजारपेठ एकूणच काय तर चित्रपटातील दुनिया पर्यटकांना पाहायला व अनुभवायला मिळेल.उदयोन्मुख कलाकारांना त्याच्यातील कला सादरकरण्याची संधी या महामेळ्या मार्फत मिळणार आहे.

 महामेळ्यातील कार्यक्रम

२८एप्रिल ते १मे या दरम्यान होणाऱ्या महामेळ्यात ३० एप्रिल रोजी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे व १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.२८ एप्रिल रोजी या महामेळ्याला सुरुवात झाली.याप्रसंगी सुप्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी ‘फिल्मी तडका विथ अवधूत गुप्ते हा कार्यक्रम सादर करून महामेळ्याचा शुभारंभ केला. महामेळ्याच्या दुसऱ्या दिवशी खास पर्यटकांसाठी  फिल्मी धमाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.फिल्मी धमाल या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री मानसी नाईक व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सुप्रसिध्द कलाकार यांचा सहभाग आहे. ज्यांनी चित्रपट सृष्टीचा पाया रोवला अशा दादासाहेब फाळके यांची ३० एप्रिल रोजी जयंती आहे याचेच औचित्य साधून एका दिमाखदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून अवधूत गुप्ते दादासाहेब फाळके यांना आदरांजली वाहतील. १मे ला महाराष्ट्र दिनाचे प्रयोजन साधून मराठमोळीशाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१ मे हा एन.डी. स्टुडिओतील या महामेळ्याचा शेवटचा दिवस आहे. या महामेळ्याची सांगता आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील गाण्यांच्या कार्यक्रमाने होणार आहे.ह्या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांतर्फे भरवण्यात आलेला हा महामेळा पर्यटकांसाठी चित्रपट सृष्टी अनुभवण्याची जणू सुवर्ण संधीच आहे.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."