‘महाराष्ट्र, जागते राहो’- गुन्हा घडायच्या आधी सावध राहा. पहा सुनील बर्वे यांचा नवीन शो आजपासून..! !

‘गुन्हा’ म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन केलेली ,चोरी, किंवा केलेला अपराध. सर्व सामान्य माणसाला कायद्याची चौकट तोडून गुन्हा करायची आवश्यकताच नाही, कारण आपला देश लोकशाही जपणारा देश आहे. लोकांचं राज्य आहे. म्हणून लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या साठी देश सेवा, करत असतात. आणि आपण आपले काम, व्यवसाय, नोकरी करत असतो. देशाचं संरक्षण आपली सेना दिवस रात्र करत असते. त्यामुळे आपल्याला खरं तर कसली चिंता वाटायला नको. पण तरी सुद्धा सगळीकडे कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन गुन्हे केले जातात. हे गुन्हे कोण करतात? तर जे लोक स्वार्थी आहेत, ज्यांना फक्त स्वतःसाठी संपत्ती जमवायची आहे, स्वतः ला सत्तेवर टिकून राहायचं आहे, जे स्वार्थासाठी लोकांना फसवतात, जे कायद्यातून पळवाटा शोधत असतात, लोकांना लुबाडून जमिनी लाटायच्या आहेत, जे कायदा मानत नाहीत ते लोक गुन्हे करतात. ह्या गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. अवैध मार्गाने संपत्ती मिळवणे, दहशत निर्माण करून लोकांना लुबाडणे, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी घेणे, खून करणे, मारहाण करणे, खोटे वागून पैसे लुबाडणे, मानसिक छळ करणे, ढोंग करून पैसे लुबाडणे, लोकांमध्ये भांडण लावून देणे, बलात्कार, जुगार, अवैध दारू विक्री, अपघात घडवून आणणे, हे सगळे गुन्हे कुठे ना कुठेतरी चालू असतात.

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

ह्या गुन्ह्यांचा मुख्य उद्देश कायद्याच्या विरुद्ध जाऊन पैसे, सत्ता, जमिनी, जबरदस्तीने, दहशतीने मिळवणे हाच असू शकतो. घरातले छोटे मोठे वाद सुद्धा गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतात. पण हे सगळे गुन्हे होण्याआधी आपण काही काळजी घेतली तर आपण गुन्ह्यांचे शिकार होणार नाही किंवा काही गोष्टींचे पालन केले तर आपल्याकडून कधी गुन्हा होणार नाही. मग ते घडायच्या आधी काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? हे कळायला आपल्याला ह्याच गोष्टींवर तयार केलेला एक अतिशय चांगला कार्यक्रम बघावा लागणार आहे. आज पासूनच म्हणजे ३१ जानेवारी पासूनच हा कार्यक्रम दर गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी सतत तीन दिवस रात्री साडेनऊ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होतो आहे.

गुन्हे कसे घडतात, ते टाळण्यासाठी सर्व सामान्य लोकांनी कोणती काळजी घ्यायची, एक एक न माहिती असलेली गोष्ट उलगडत जाणार आहे. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल अशा काही गोष्टी सर्व सामान्य जनतेला माहिती होणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या जवळपास घडणाऱ्या गुन्ह्यापासून निश्चित सावध राहणार आहोत. काही फसवणुकीपासून आपला बचाव होईल. काही गुन्हे आपल्या सावधानते मुळे घडूच शकणार नाहीत. म्हणजेच गुन्ह्यांना आळा बसेल. म्हणून आपल्याला सतर्क करणारा हा कार्यक्रम बघणं जरुरीचं आहे. आपल्या मराठीतून हे सगळं आपल्या पर्यंत पोचणार आहे. आपल्याला फक्त त्या ठरलेल्या वेळेला टी व्ही बघायचा आहे. ह्या अगदी वेगळ्या वाटणाऱ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे मराठी सिनेसृष्टीत गाजलेला एक अभिनेता ज्याचं नाव आहे ‘ ‘सुनील बर्वे’. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला चुककवायचं नाही. नाहीतर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजणारच नाहीत. ३१ जानेवारी पासून दर गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९:३० वाजता. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पहा एक चांगला कार्यक्रम.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...