“तासभर बसा न पोटभर हसा” अशी ही हसवा हसवी ची जत्रा, चल बघू मित्रा.. आजचा ग्रँड फिनाले..

“तासभर बसा न पोटभर हसा”  अशी ही हसवा हसवी ची जत्रा, चल  बघू मित्रा.. आजचा ग्रँड फिनाले.. 

 

जत्रेला चला तुम्ही जत्रेला चला….सोनी मराठीवर,  पण कसली जत्रा?   हास्य जत्रा, हास्य जत्राsss. आपली, आपल्या ‘महाराष्ट्रची हास्य जत्रा’  एकदम भन्नाट, हसून हसून पुरेवाट. आता कुणाची वाट बघता? पाय उचलाकी पळा लवकर. आज भारी मजा येणार , भारी मजा. कारण आज कोणीतरी जहागीरदार होणार, जहागीरदार. आहो तसला जहागीरदार नाही, कॉमेडीचा, ‘कॉमेडीचा जहागीरदार’ हा किताब मिळवणार,  हसून हसून आपली पार मुरकुंडी वळणार. कारण इतक्यादिवस ही जत्रा चालली होती , बुधवार अन गुरुवार दोन्ही दिवस हास्याची कारंजी नाही धबधबे वहात होते. लोकं नुसती गुडघ्यात डोकी घालून हसायची. म्हणून त्या कार्यक्रमाला लोक वेळेत घरी हजर होत होते. न चुकता. इतर दिवशी भले टाइम पास करतील पण बुधवार न गुरुवार अर्धा तास आधीच. सोनी मराठी चॅनल वर ही जत्रा होती. म्हणजे आता जत्रा संपली पण जत्रेत कुणाला कोणता ‘किताब’ मिळाला ते आज बघायला मिळणार आहे. म्हणजे ह्या जत्रेत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यात ज्यांनी लोकांना जास्त हसवलं त्यांना हा ‘कॉमेडीचा जहागीरदार ‘किताब मिळणार. बक्षीस मिळणार.

 

READ ALSO :  ज्यांच्या सिनेमाचा ट्रेलरच अंगावर काटे आणतोय तो सिनेमा कसा असेल..!!??

पण हा किताब द्यायच्या आधी एकदम भारी भारी हसवा हसवीचे कार्यक्रम होणार आहेत. ते कार्यक्रम म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा भारी म्हणजे ‘अर्क’ असणार आहे. आणि तो कार्यक्रम जर नाही बघितला तर काहीच नाही बघितलं. ‘कस’ लागणार आहे हसवण्याचा. आणि त्याच्यात जो ‘भारी’ तो ह्या किताबाचा ‘मानकरी’. म्हणून ही हास्य जत्रा बघायलाच पाहिजे.  ह्याच्यात  ही सगळी  हसवा हसावी करणारी मंडळी कोण आहेत माहितीये का? चार मोठे हिरे आहेत हिरे, जे फक्त लोकांना हसवायलाच आलेत जन्म घेऊन. एकापेक्षा एक अफलातून. 

कोण कोण आहे माहिती आहे?  पहिला हिरा म्हणजे  ‘प्रसाद खांडेकर’ दुसरा ‘समीर चौघुले’ तिसरी ‘विशाखा सुभेदार’ आणि चौथी आहे ‘नम्रता आवटे’ असले सगळे हे एकापेक्षा एक हिरे आणि त्यांच्या गटात आणखी काही हिरे असे चार गट आहेत आणि हे सगळे मिळून आज आपली  हसून हसून मुरकुंडी वळवणार आहेत. माणसाने हसलं की एकदम फ्रेश होतो, मनावरचा ताण निघून जातो. हृदय चांगलं काम करायला लागतं. शरीरातलं रक्ताभिसरंण चांगलं होतं. म्हणून हसणं जरुरीचं आहे , अहो मनावरचा ताण लोकांचा इतका वाढलाय की माणसं महिना महिना हसतच नाहीत.  तर मग तयार व्हा आजच पाहायचाय हा सोनी मराठीवरचा  कार्यक्रम, “महाराष्ट्राची हास्यजत्रा” , ह्यातल्या विजेत्या टीम ला ‘कॉमेडीचा जहागीरदार’ हा किताब दिला जाणार आहे. ही हसवा हसवीची स्पर्धा आज रात्री ९ वाजता  म्हणजे २७ डिसेंबर २०१८ रोजी म्हणजे आजच आहे हे लक्षात असुद्या. ह्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत  मराठी सिनेमातले दिग्गज म्हणजे  “प्रसाद ओक” आणि  “सई ताम्हणकर”. आणि ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार एक सुंदर अभिनेत्री  “प्राजक्ता माळी”. मग चला, ‘तासभर बसा न पोटभर हसा’. पाहायला विसरू नका ” महाराष्ट्राची हास्यजत्रा”  कोण होणार ‘कॉमेडीचा जहागीरदार’……?

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author