‘मेरी झांसी नही दुंगी’ म्हणत आपल्यालाही हरहर महादेव चा जयघोष करायला लावणार मणिकर्णिका..!!

‘मेरी झांसी नही दुंगी’ म्हणत आपल्यालाही हरहर महादेव चा जयघोष करायला लावणार मणिकर्णिका..!!

 

“झाशीची राणी लक्ष्मीबाई” एवढंच नाव म्हणजे वीरता, शूरता, साहस, देश प्रेम, आस्था, ह्या सगळ्या वैशिष्ट्यांनी चमकणारी एक कर्तव्य दक्ष, करारी, स्त्रीच फक्त डोळ्यासमोर उभी राहते. वाराणसी सारख्या पवित्र स्थळी, मराठी भाषिक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली ही भारत मातेची सुपुत्री. “मणिकर्णिका ” नाव तिचं, तेजस्वी, चपळ, धाडसी, म्हणूनच मोठी होत असताना युद्धनीतीचे धडे घेत घेत पारंगत झाली. झाशीच्या राजपुत्र गंगाधरराव नेवाळकरांशी तिचा विवाह झाला. आणि परंपरेनुसार तिचे नाव बदलले गेले आणि “लक्ष्मी” नाव ठेवले गेले. पुढे एका पुत्र रत्नाला तिने जन्म दिला. पण अवघ्या चार महिन्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गंगाधर रावांनी आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले, त्याचे नाव दामोदरराव. काही वर्षानंतर गंगाधररावांचा मोठ्या आजारामुळे मृत्यू झाला.एकावर एक दुःखाचे डोंगर, त्यात दामोदरराव वारस म्हणून गादीवर बसायला प्रजेच्या काही मोठ्या लोकांनी अमान्य केलं. 

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

इकडे इंग्रज ’गिधाडांसारखे’ झाशीकडे नजर लावून टपून बसले होते. पण झाशीला उत्तराधिकारी नव्हता, जर तो उत्तराधकारी वेळेवर नाही मिळाला तर ही ’इंग्रज गिधाडे’ झाशीवर कब्जा मिळवतील अशी भीती प्रजेला वाटत होती. म्हणून राणी लक्ष्मीबाईने राज्याची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. “झाशी” म्हणजे ‘मराठा साम्राज्याचा शासित भाग’ होता. म्हणून इंग्रज त्यावर ताबा मिळवायच्या प्रयत्नात होते. झाशीची सत्ता त्यांना काबीज करायची होती, पण झाशीची महाराणी लक्ष्मीबाई रुद्र रूप धारण करून कडवा विरोध करायला लागली होती. इंग्रज त्या विरोधाला लांबूनच ओळखून होते. कारण महाराणी झाशीच्या प्रजेचा विश्वासाने सांभाळ करत होती.झाशी काबीज करायची इतकी सोपी गोष्ट नव्हती,  इंग्रजांनी एकामागून एक अनेक हल्ले केले पण राणी लक्ष्मीचा कडवा विरोध त्यांना त्यांचे मनसुबे पूर्ण करू देत नव्हता. इंग्रजांनी त्यांचे सैन्य वाढवायला सुरुवात केली आणि झाशीवर सगळीकडून हल्ले केले पण झाशीच्या सैन्याने ते सगळे हल्ले परतवून लावले. आणि आपली ताकत वाढवण्यासाठी तात्या टोपे यांची मदत मागितली. तात्या टोपे आणि बंधू नानासाहेब पेशवे ह्यांनी मदत दिलीही, आणि झाशीच्या सैन्याला आणखी मोठी ताकत मिळाली. आजूबाजूच्या काही मुगल सम्राटांनी सुद्धा राणी लक्ष्मीला साथ द्यायची तयारी केली. एक मुस्लिम गुलाम तोफखाना सांभाळायला धावून आला. अशी १४००० मातब्बर जवानांची फौज इंग्रजांच्या विरोधात उभी ठाकली….१८५८ इंग्रजांविरुद्ध झाशीच्या युद्धाला सुरुवात झाली, “राणी लक्ष्मी” साक्षात रणरागिणीच्या रूपात इंग्रजांना सामोरी गेली. तिने ठाम निश्चय केला की आता मला काहीही करून झाशीचं रक्षण करायचं आहे, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे” आता मी माझ्या शरीरात रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत ह्या झाशीला इंग्रजांच्या हाती लागू देणार नाही.  “”” हर   हर   महादेव”” सतत सात दिवस इंग्रजांविरुद्ध तोफेच्या गोळ्यांचा वर्षाव चालू होता. इंग्रज सैन्य अफाट होतं. एक एक इंग्रज कापला जात होता. वीरश्री अंगात शिरलेली “राणी लक्ष्मी” दामोदराला पाठीला बांधून निकराची लढाई लढण्यासाठी निघाली. घोडा चौखूर उधळला…….”हर हर महादेव” …. समोर येईल तो इंग्रज शिपाई  सपासप कापत सुटली… ‘माझी झाशी मी देणार नाही’sss आणि झाले “घनघोर युद्ध”.

अहो हा होता झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा थोडासा इतिहास. हा नुसता वाचायला लागल्यावरच अंगावर शहारे येतात. मग प्रत्यक्ष काय असेल ह्याची कल्पनाच करू शकतो आपण. कारण ते होतं १८५८ साल. आता आपण वावरतो आहोत इलेकट्रॉनिक काळात. मग हाच इतिहास आपल्याला जर कोणी मोठ्या पडद्यावर दाखवू असं म्हणालं तर धन्य झाल्यासारखं वाटेल ना? खरंच अख्खा हिंदुस्थान ह्या गोष्टीला तयार होईल कारण भारत भूमीच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, ज्यांनी बलिदान केलं आहे त्यांचा इतिहास रोमांचकारीच असल्यामुळे तो मोठ्या पडद्यावर बघायला निश्चितच आवडेलकी. “कंगना राणावत” साकारणार आहे” झाशीची राणी लक्ष्मीबाई” मोठ्या पडद्यावर. त्याच वीरश्रीने, त्याच तडफदार भूमिकेत ती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तिच्या बरोबर अनेक दिग्गज कलाकार झाशीच्या वैभवात चमकणार आहेत. कुलभूषण खरबंदा, सुरेश ओबेरॉय, असे दिग्गज ह्या सिनेमात दिसणार आहेत.  याशिवाय अनेक मराठी कलाकार सुद्धा आपला अभिनय साकारणार आहेत, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे ही मराठी टीम आहे. मोठे वैभव, राजवाडे, हत्ती, घोडे पायदळ, तोफा असे साम्राज्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडणार आहे. प्रत्यक्ष घनघोर युध्दातला थरार अनुभवायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा शासित प्रदेशाच्या मराठी खुणा बघायला मिळतील असे वाटते आहे. तेंव्हा व्हा सज्ज पुन्हा रक्त सळसळवणारा ह्या महान भारतमातेच्या वीर कन्येचा महा पराक्रम बघायला. ‘मणिकर्णिका’ पाहायला…!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author