२०१९ ची सुरुवात आणि दोन मोठे चित्रपट, बघा पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा कोणता ठरला…!!

२०१९ ची सुरुवात आणि दोन मोठे चित्रपट, बघा पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा कोणता ठरला…!!

ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन बायोपिक चित्रपट रिलीज झाले. ज्या दोन्ही चित्रपटांची सिने रसिक वाट पाहत होते. पहिला चित्रपट म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वावर आधारित चित्रपट म्हणजे “ठाकरे”. आणि दुसरा बायोपिक म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई च्या झुंजार आयुष्यावर प्रकाश टाकणारा “मणिकर्णिका” हा चित्रपट. दोन्ही चित्रपट हे ह्या नवीन वर्षाची दणदणीत सुरुवात करणारे असे चित्रपट. त्यातला ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतून तयार केला गेला. आणि देशभर प्रदर्शित झाला.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

‘ठाकरे’ ह्या चित्रपटात एक हिंदी चित्रपट सृष्टीत नावाजलेला कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेला ‘नवाजुद्दीन सिद्दीकी’ ह्याने बाळासाहेब ठाकरे ह्यांची जबरदस्त भूमिका वठवली. तर ‘मणिकर्णिका’ ह्या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका ‘कंगना राणावत’ ह्या अभिनेत्रीने रंगवली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे’ ह्यांच्या नेतृत्वात काम केलेली बरीच मंडळी हा चित्रपट पाहायला हजर असणार. पण झाशीच्या राणीला आपल्या पैकी कोणीही पाहिलेलं नाही. हे दोन्ही चित्रपट पाहताना रसिक प्रेक्षकांना ह्या दोन्ही गोष्टीतला फरक निश्चितच जाणवत असेल. दोन्ही चित्रपट काढण्यामागचा उद्देश हा वेगवेगळा आहे हेही विचारात घेऊन प्रेक्षक चित्रपट पाहतील का? मग कोणता चित्रपट किती यशस्वी होतो हे ठरवायला कोणते निकष लावावे हेही विचारात घेतले पाहिजे.

आता हे दोन्ही चित्रपट गेल्या शुक्रवारी सगळीकडे रिलीज झाले. ‘ठाकरे’ चित्रपटाचे प्रदर्शन हे ऐकूण १३०० चित्रपट गृहात एकाच वेळी झाले, ह्या चित्रपटाचे बजेट हे सुमारे २५ ते ३० कोटीचे होते. पहिल्याच दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ४ कोटींची कमाई केली. चांगली कमाई. आणि दुसरा चित्रपट ‘मणिकर्णिका’ हा बिग बजेट चित्रपट, ह्या चित्रपटचं बजेट होतं १२५ कोटी. ह्याचं प्रदर्शन एकूण ३७०० चित्रपट गृहातून एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी केलं गेलं. आणि ह्या चित्रपटाने पाहल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाई केली सुमारे १३ कोटींची. मग आता कोणता चित्रपट सरस ठरला हे रसिक प्रेक्षकांनी ठरवावं. पण कमाई चे आकडे हे पहिल्या दिवशी ‘मणिकर्णिका’ ह्या चित्रपटाला एक नंबरवर ठेवतात.

तुम्ही कोणत्या चित्रपटाला पसंती द्याल ? कारण शेवटी आपल्याला काय आवडेल हे कोणी दुसरा ठरवू शकत नाही. म्हणून जपली पाहिजे ‘आवड आपली आपली’. कोणी दुसरा सांगतो म्हणून काही गोष्टी केल्या तर कधी कधी पैसे आणि वेळ वाया जाऊ शकतो. आणि आपले आपण ठरवले की तितकं वाईट वाटत नाही. पण मणिकर्णिका मध्ये आपण फक्त वाचलेला इतिहास प्रत्यक्ष रूपात पहायचाय. आणि ठाकरे ह्या चित्रपटात आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तीचा इतिहास पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कसा साकार केलाय ते पाहायचं आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author