राज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेल्या मराठी चित्रपट ‘मंत्र’ ने यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आपला ठसा उमटविला. राज्य पुरस्कारामध्ये सामाजिक विषय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निर्माता संजय काटकर,दिग्दर्शक हर्षवर्धन आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून शुभंकर एकबोटे यांना पुरस्कार देण्यात आले.

माणूस फक्त पैशासाठी काम करत नाहीतर त्या कामात तो समाधान शोधतो’ हे  चित्रपटातील वाक्य ‘मंत्र’ च्या निर्माते आणि दिग्दर्शकांना तंतोतंत लागू पडते. आय.टी क्षेत्रात काम करत असतानाच चित्रपटाची निर्माण प्रक्रियाही त्यांना आकर्षित करत होती. त्यामुळेच दोनेक वर्षात या क्षेत्रात लागणाऱ्या तांत्रिक बाजूंचे कौशल्य अवगत करून वेदार्थ क्रिएशन्सच्या देवेंद्र शिंदेरजनीश कलावंतसचिन पंडित यांनी  संगीतकार विश्वजित जोशी यांच्या बरोबर  मंत्र’ ची योजना करून ती  ड्रीमबुक प्रोडक्शन्सच्या संजय काटकर यांच्यापुढे मांडली. विषयाचं वेगळेपण भावल्यान त्यांनीही या चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच मार्केटींग आणि सादरीकरणाची जबाबदारी घेतली.

निर्मातेदिग्दर्शक यांच्या बरोबरच मुख्य भूमिका करणारा सौरभ गोगटे या सर्व IT मधील लोकांचा मंत्र’ हा पहिलाच चित्रपटपण पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसंस्कृती कलादर्पण मागोमाग महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातही जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरला हे या टीमच्या प्रयत्नांचे यश आहे. याच महिन्यात जर्मनीमध्ये होणाऱ्या मराठी चित्रपट उत्सवासाठीही  मंत्र’ ची निवड केली आहे. 

देव आणि धर्म या विषयावर भाष्य करणं हे आजच्या काळात खूपच धाडसाचे काम आहे. पण हा  अत्यंत संवेदनशील विषय ‘मंत्र’ या चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा ‘मंत्रची कथा घडते. प्रेक्षकांनासमीक्षकांना आणि वेगवेगळ्या महोत्सवातील तज्ज्ञ परीक्षकानांही चित्रपटाचा विषयत्याची मांडणी आणि लेखकान मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांनी प्रभावित केले आहे. खर तर लेखानाप्रमाणेच या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयालाही सर्वत्र दाद मिळते आहे. पदमश्री मनोज जोशीदीप्ती देवीपुष्कराज चीरपुटकरसिद्धेश्वर झाडबुकेसुनील अभ्यंकर यांच्या बरोबरच अनेक नव्या चेहर्यांनी कमाल केली आहे. सनी आंबवणे हे पात्र रंगवणारा शुभंकर एकबोटे हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा. त्याचा अभिनय आईसारखाच नैसर्गिक वाटतो. एकंदर या IT मधल्या तज्ज्ञ लोकांकडून भावी काळातही चांगला content तयार होण्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author