जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

जाणून घ्या किती मानधन घेतात हे नामवंत मराठी अभिनेते आणि अभिनेत्री?

मराठी चित्रपटांनाही आता खूप मागणी आहे हे सगळ्या चित्रपटगृहांच्यासमोर दिसणाऱ्या अलोट गर्दीवरून जाणवतेच आहे. याशिवाय नवीन आलेल्या कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती दिवसात किती कमाई केली हे आपल्याला मीडियामुळे घरबसल्या कळायलादेखील लागलंय.

कोणत्या चित्रपटाचा कोण हीरो आणि कोणती हिरॉइन झळकणार हेही घरी बसून आपल्याला कळतंय, त्यामुळे आपल्यासारखे सर्वसामान्य चित्रपट रसिकसुद्धा आता अंदाज बांधू शकतात की हा हीरो आणि ही हिरॉईन आहे तर हा चित्रपट चांगलाच असणार किंवा बरा असेल किंवा चांगला नसणारच. मग आपण ठरवतो की हा चित्रपट आज बघायचा किंवा नंतर बघायचा. काही लोक तर ठराविक हीरो किंवा हिरॉईन असेल तर फर्स्ट डे फर्स्ट शो बघतातंच.

काही हीरो किंवा हिरॉईन तर सिने- रसिकांचे लाडके असल्यामुळे त्यांच्या चित्रपटांची ही मंडळी वाटंच पाहत असतात.

असे अनेक सिनेरसिक सतत चित्रपट पाहतात आणि आपल्या प्रतिक्रियाही मीडियाला देतात. त्यामुळे हे चित्रपट चांगली कमाई करतात. सतत हाऊसफुल्ल होणाऱ्या चित्रपटांच्या हीरो आणि हिरॉईनचा मग भाव वधारतो. आणि हळूहळू ह्या अभिनेत्याची अथवा अभिनेत्रीचे मानधन वाढायला लागते. आपले मराठीतले काही अभिनेते आणि अभिनेत्री आजकाल चांगली कमाई करताना दिसतात. त्यात त्यांच्या अभिनयाची कसब, त्यांच्या स्टाईल्स, त्यांचे सौंदर्य, त्यांच्या अदा,  ह्यांचा मोठा वाटा असतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि त्यांनाच मोठा “भाव” मिळत जातो.

काय आहे सध्याच्या ह्या आपल्या मराठी नावाजलेल्या काही हीरो आणि हेरॉईनचे”भाव”? म्हणजे त्यांची एका चित्रपटात काम करण्यासाठी मिळणारी मानधनाची रक्कम? सध्या सगळ्यात जास्त “भाव” खाणारा अभिनेता आणि अभिनेत्री ही त्यांच्या मानधनावरून ठरवले गेले आहेत. ह्यात त्यांचं अभिनयाचं कसब, कामातलं सातत्य, विविध प्रकारच्या भूमिका, त्या मागचे त्यांचे कष्ट, हे महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं.

१. सध्या सर्वात जास्त कष्ट घेऊन , विविध भूमिका चोख वठवणारा , सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे ‘ स्वप्निल जोशी’.
त्याचे अनेक चित्रपट आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आणि गाजलेही. त्यातले ‘दुनियादारी’ , ‘मितवा’, मुंबई – पुणे – मुंबई, हे चांगले गाजले. आता एक शाहरूख खान आणि  रोहित शेट्टी ह्या दोघांनी मिळून प्रोड्युस केलेला चित्रपट येतोय , त्याचं नाव अजून ठरायचं आहे पण त्या चित्रपटाचा नायक असणार आहे स्वप्निल जोशी. आता अनेक हिंदी चित्रपटनिर्माते मराठी अभिनेत्यांचे टॅलेंट बघून मराठी चित्रसृष्टीकडे आकर्षित झाले आहेत त्यामुळे अशा टॅलेंटेड अभिनेत्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्यातरी स्वप्निल जोशी एका चित्रपटासाठी ४५ ते ५० लाख घेतो असा बोलबाला आहे.

२. दुसरा गुणी अभिनेता आहे “अंकुश चौधरी”. चिकणा दिसणारा आणि चांगली उंची लाभलेला हा अभिनेता बऱ्याच चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळाला. हा गेली अनेक वर्षे आहे तसाच आहे, म्हणजे कदाचित आपल्या डाएटवर हा अंकुश ठेऊन असावा असे वाटते. सध्याचे ह्या अभिनेत्याचे गाजलेले चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’ , ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट्स’, आणि अश्या अनेक चित्रपटात त्याचे नाव झळकत राहिले आहे. २५ ते ३० लाख ह्याचे मानधन असते.

३. नंतर नंबर लागतो एका अभिनेत्रीचा तिचं नाव आहे ” सई ताम्हणकर” अतिशय कमी वेळात मोठं यश मिळवणारी ही अभिनेत्री. खूप सुंदर नाही पण कष्ट घेऊन नावारूपाला आलेली ही अभिनेत्री . संजय जाधव ह्यांच्या अनेक चित्रपटांची ही नायिका सिने रसिकांना भावली आणि चांगलीच गाजलीसुद्धा. २०१८ मध्ये तरी ही सगळ्या अभिनेत्रींनमध्ये वरचढ ठरली. २० ते २५ लाखाचे मानधन मिळवणारी सध्या ही एकटीच मराठी अभिनेत्री आहे. हिने दोन हिंदी गाजलेल्या चित्रपटातही चांगली कामे केलीत. मराठी गाजलेले चित्रपट म्हणजे  ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, टाइम प्लिज.

४.- पुढचा नंबर लागतो एका सर्वगुण संपन्न अभिनेत्रीचा, ती म्हणजे “सोनाली कुलकर्णी १.’
नाट्य आणि सिने अशा  दोन्ही क्षेत्राचा अनुभव असलेली एक कसलेली अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत हिचं चांगलं नाव आहे. पारखून रोल करणारी अभिनेत्री.  ‘गुलाबजाम’ , ‘कच्चा लिंबू’ , ‘देऊळ’, हे सोनाली कुलकर्णीचे आत्ताचे गाजलेले चित्रपट. या आधी भरपूर चित्रपटात तिने त्या त्या भूमिकेला उत्तम न्याय देऊन तिचे मराठी सिनेजगतातले तिचे वर्चस्व दाखवून दिले. त्यामुळे रिपोर्ट नुसार तिच्या कामाचा मोबदला हा १५ ते १९ लाखाच्यामध्ये असतो.

५. “उमेश कामत” चॉकलेट हीरो आज मराठी सिनेमात चांगला जम बसवून चांगली कमाई करणाऱ्यांच्या यादीत आहे. अनेक चित्रपट, मालिकात वेगवेगळी पात्रं त्याने यशस्वीपणे रंगवली आहेत आणि रसिकांवर आपली जादू चालवली आहे. ‘बाळकडू’, ‘ टाइम प्लिज, ‘, ‘ ये रे ये रे पावसा’, हे “उमेश कामत ” ने चांगला न्याय दिलेले चित्रपट. अशा ह्या हिरोला निश्चितच चांगले मानधन मिळायलाच हवे. साधारण १० ते ११ लाख इतके त्याचे मानधन असते.

६.-” सोनाली कुलकर्णी २”, ही सुद्धा कमी वेळात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री. अप्सरा आsssली… हे नटरंग मधले तिच्याच गाण्यातले बोल तिला योग्य वाटतात. कारण नटरंगमधल्या ह्या गाण्याप्रमाणेच  तिने अप्सरेच्या अदांनी प्रेक्षकांना लुब्ध केले आणि तिचे नृत्यातले श्रेष्ठत्व सिद्ध केले. पुढे मराठी चित्रपटसृष्टीवर सत्ता निर्माण करायला सुरुवात केली. “क्षणभर विश्रांती”,  “मितवा”, “नटरंग”, “पोस्टर गर्ल, “, “क्लासमेट्स”. हे सोनाली कुलकर्णीचे गाजलेले चित्रपट. रिपोर्टप्रमाणे तिचे एका चित्रपटाचे मानधन १० ते १२ लाखाच्यादरम्यान असते.

७.-“अमृता खानविलकर” नृत्य आणि मेहनत ह्या गुणांवर अमृता खानविलकर आज मराठीसिनेसृष्टीतली आवडती कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. हसरा चेहरा आणि सौंदर्य ह्या दोन्ही गोष्टींवर रसिकांना तिने आपलंसं केलं आहे. “अर्जुन”, “कट्यार काळजात घुसली “, “वेलकम जिंदगी”,  “आयना का बायना” ह्या चित्रपटात तिने उत्कृष्ट भूमिका केल्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. म्हणून आज ती चांगले मानधन घेते म्हणजे जवळपास १०लाख.

८.-सुबोध भावे….एक हरहुन्नरी, गुणी, कलाकार. मराठी चित्रपटसृष्टीला मोठं करण्यासाठी धडपडणारा, फिल्म, थिएटर,आणि टेलिव्हिजन ह्या तिन्हींमध्ये लोकप्रिय असलेला हा कलावंत, अभिनेता, त्याच्या कर्तबगारीमुळे “ग्रेट” समजला जातोय.  “बाल गंधर्व”,  “लोकमान्य एक युग पुरुष” , “कट्यार काळजात घुसली” आणि नुकताच आलेला “… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर” ह्या मोठ्या कलाकृती त्याने समर्थपणे पेलल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. ह्या गुणी कलाकाराला सिनेसृष्टीत भरपूर मान मिळतो आहे आणि रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. ह्या गुणी कलाकाराचे मानधनही  आज १० लाखाच्या आसपास आहे.

(हा सगळा रिपोर्ट जून 2018 पर्यंतचा आहे.)

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author