सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थित पडद्यामागील तंत्रज्ञ व कलावंतांचा सन्मान

सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थित पडद्यामागील तंत्रज्ञ व कलावंतांचा सन्मान

(नवी मुंबई) अनघा इव्हेंट्स, डी एस एंटरटेनमेंट आणि रंगमंच कामगार संघ (रजि.) यांच्या सयुंक्त विद्यमानाने बॅकस्टेज हिरोज सन्मान या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठया थाटात चित्रपट , नाट्य व मनोरंजन क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर) , सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक समीत कक्कड, अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम , अखिल भारतीय नाट्य परिषेदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगमंच कामगार संघाचे अध्यक्ष रत्नकांत जगताप, अभिनेत्री सिमा देशमुख, दिग्दर्शक श्रीरंग देशमुख, अभिनेत्री कुंजीका काळवींट, आयोजक उमेश चौधरी , अनघा लाड, नगरसेवक संजूवाडे व समाजसेवी देवेंद्र खडसे ,शेफ गौरी गुजर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यात सुप्रसिद्ध चित्रपट वितरक सादिक चितळीकर ज्यांनी सैराट, नटसम्राट, लय भारी, नाळ अश्या यशस्वी दिडशेच्या वर चित्रपटाचे उत्तम वितरण केले, हिंदी व मराठी चित्रपट नाटकांचे पोस्टर डिझाईन करणारे सचिन गुरव, आनंद गायकवाड (निर्मिती प्रमुख), भारत कुचेकर (फिल्म सेटिंग), शिवराज छाब्रा (साउंड रेकॉर्डिस्ट), राजीव वाघ (निर्मिती व्यवस्था), उत्तम मानकर (निर्मिती व्यवस्था), उमाना वैजू किणीकर(प्रकाश योजना) या चित्रपट सृष्टीतील तंत्रज्ञ यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर नाट्य सृष्टीतील रंगकर्मी ज्यांनी चार दशके काम बघितले आहे अश्यांचा समावेश आहे.

 

READ ALSO :  बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

शिवाजी मंदिरचे बाळूमामा, प्रकाश योजना बघणारे सुरेश पेडणेकर, रंगमंच व्यवस्था बघणारे विश्वनाथ तायडे, गाजलेल्या नाटकांसाठी वेशभूषा करणारे एकनाथ तळगावकर , ध्वनी सयोंजक सदानंद कोरगावकर, मेकअप मॅन वामन गमरे , नैपथ्य विभाग बघणारे महिपत पांचाळ, रंगमंच व्यवस्था सुनील सावंत, कलाध्यापक श्रीहरी पवळे ज्यांनी पंचवीस वर्ष मोफत बालनाट्य शिबीर आयोजित केले व कलावंत घडविले.

आपल्या भाषणात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी नमूद केले कि “हे सर्व लोक आमच्या साठी बॅकबोन आहेत, ज्यांच्या मुळे आमची कलाकृती प्रेक्षकांसमोर येऊ शकते .”

विविध क्षेत्रात योगदान देणारे जसे कि मयूर धुमाळ जे पोलीस परीक्षण खाकी ट्रेनींग अकॅडेमी चालवतात . अफशा कापडिया ज्या फॅशन इन्स्टिट्यूट चालवतात , सिनेमॅटोग्रापर पियुष घाडगे , सेलिब्रेटी फोटोग्राफर संतोष गंभीरे, प्रीती सींग , डीजे विकी , अभिनेता मयुर पवार , प्रभाकर बेलवी या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author