‘रोटी डे’ जनजागृतीसाठी कलावंतानी काढली पदयात्रा

पुणे, दि. २५ – येत्या १ मार्च रोजी ‘रोटी डे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जनसामान्यात हा उपक्रम पोहचवण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी मराठी कलावंताच्या वतीने सोमवारी पदयात्रा काढण्यात आली, यामध्ये नाट्य -चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत गरजूंसाठी मदत करण्याचे आवाहन केले.

अभिनेता अमित कल्याणकर याच्या पुढाकारातून उदयास आलेल्या ‘रोटी डे’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे. पत्रकार भवन ते अलका टोकीज चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या पदयात्रेत ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्री मालविका गायकवाड, अभिनेते सुनील गोडबोले, श्रीकांत यादव, विनोद खेडकर, आरजे संग्राम, संगीतकार ओंकार केळकर, निर्माता प्रमोद रणनवरे, निवेदिका शोभा कुलकर्णी, कला-दिग्दर्शक गिरीश कोळपकर, अनिरुद्ध हाळंदे आदींसह अ. भा. नाट्य परिषद, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आज जगभर विविध समाजसेवी संस्था, संवेदनशील नागरिक गरजू लोकांची मदत करत असतात, मात्र संस्थेला देखील गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा आहेत. यातूनच ‘रोटी डे’ ही अभिनव संकल्पना उदयास आली. या दिवशी, प्रत्येकाने आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींना फळे, पोळी-भाजी, वरण-भात, ज्वारी, बाजरी इ. सामान मदतीच्या स्वरुपात द्यावे, तसेच त्या व्यक्तीबरोबर आपला एक फोटो काढून सोशल मिडीयावर ‘रोटी डे’ च्या निमित्ताने शेअर करावा. सोशल मीडियाची ताकद ओळखून, हा मदतीचा हात अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवणे, हा त्यामागील उद्देश असल्याचे अमित कल्याणकर याने सांगितले.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author