मराठमोळी सेलिब्रिटी क्रिकेट लीग लवकरच रंगणार आहे रसिकांची पंढरी असलेल्या ठाण्यात..!!

मराठमोळी सेलिब्रिटी क्रिकेट लीग लवकरच रंगणार आहे रसिकांची पंढरी असलेल्या ठाण्यात..!!

फेब्रुवारीच्या १, २ आणि ३ तारखा राखून ठेवा, कारण आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील सगळे तारे क्रिकेटच्या ग्राऊंडवर उतरणार आहेत. त्यांच्यामध्ये रंगणार आहे ‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग स्पर्धा.’ ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘दादोजी कोंडदेव स्टेडियमचे’ उद्घाटन या स्पर्धेने होणार असल्याची माहिती आयोजकांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धेच्या ट्रॉफी आणि थीमसॉंगचे अनावरण देखील करण्यात आले. हे थीमसॉंग सोहम पाठक यांनी तयार केले असून गीत विजू माने यांचे आहे तर प्रसेनजीत कोसंबी याने गायले आहे. तसेच स्पर्धेसाठी विकास रेपाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती देवी हिने केले.

 

READ ALSO :  सर्व लाईन्स व्यस्त आहेत पण फोन च्या का हृदयाच्या..? कळेल लवकरच

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, महापालिकेने नूतनीकरण केलेल्या स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होत आहे ही उत्तम बाब आहे, या ठिकाणी भविष्यात स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध होतील. शिक्षण सभापती विकास रेपाळे म्हणाले, महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग हा स्तुत्य उपक्रम आहे. ठाण्यात कलारसिकांची मांदियाळी आहे, शहराचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, यामुळे या स्पर्धेची थीम ठाणेकरांच्या पसंतीस पडेल. विजू माने यांनी आता ठाण्यात आम्हा राजकारण्यांसाठीही अशी स्पर्धा घ्यावी, राजकारणातली आमची फायनल मॅच एप्रिल मध्ये होणार आहे. अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, आम्ही आमच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी क्रिकेटची ओढ आम्हाला खेळाच्या मैदानात घेउन येते. सिद्धार्थ जाधव म्हणाला, आम्ही आता लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. संजय जाधव म्हणाले, विजू माने यांना मी खूप वर्षे बघतोय, त्यांनी शून्यातून आपला प्रवास सुरु केला, त्यांच्यावरील प्रेमापोटी मी इथे आहे. सौरभ गोखले म्हणाला, मी पुण्याचा असलो तरी दोन्ही शहरांचे क्रिकेट बद्दलचे प्रेम सारखेच आहे. विनोद सातव म्हणाले, मिडियातील पत्रकार नेहमी पडद्यामागे, कॅमेऱ्याच्या मागे असतात मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच आम्ही लोकांसमोर येउन खेळणार आहोत. तर महेश लिमये यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. स्पर्धेचे आयोजन ठाणे महापालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर यांनी केले आहे. ह्या स्पर्धेचे, डी. बी. एन्टरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. ह्या पत्रकार परिषदेत, स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सहा संघाचे कर्णधार अनुक्रमे ‘मुंबईचे मावळे’ – संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ – अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ – सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ – महेश लिमये, ‘पराक्रमी पुणे’ – सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ – विनोद सातव हे उपस्थित होते. या स्पर्धेत वेगवेगळ्या टिम्स मध्ये उपेंद्र लिमये, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, हृषीकेश जोशी, प्रथमेश परब, अनिकेत विश्वासराव, प्रविण तरडे, शरद केळकर, समिर धर्माधिकारी, अंगद म्हसकर, माधव देवचक्के, निरंजन नामजोशी, सुनील अभ्यंकर, विजय आंदळकर, अमित भंडारी, अमित फाळके (सोनी मराठी), मंगेश कुलकर्णी (झी स्टुडीओज), दीपक देऊळकर (संगीत मराठी) बवेश जानवलेकर (झी टॉकीज, झी युवा) विनोद घाटगे (ए बी पी माझा) कपिल देशपांडे (टीव्ही ९) विराज मुळ्ये (न्यूज १८ लोकमत) यांच्यासह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग असल्याने स्पर्धेला ‘चार चाँद’ नक्कीच लागणार आहेत. ह्या स्पर्धेत हार-जित कोणाची होते ह्यावर चाहत्यांचे नक्कीच लक्ष्य लागणार आहे. तर मंडळी आपापल्या आवडीच्या कलाकारांच्या बाजूने समर्थन देऊन ह्या सामन्याचा आनंद लुटण्यास सज्ज व्हा आणि ह्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे साक्षीदार बना..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author