पार्टी पुढे ढकलली

पार्टी पुढे ढकलली …काय सांगताय काय? काय ऐकताय काय ?… हो हो ..पार्टी पुढे ढकलली. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पार्टी आता २४ ऑगस्टला नसून ती ७ सप्टेंबरला होणार आहे. अरे अरे काय? गोंधळलात का? गोंधळू नका… मी बोलत आहे, बहुचर्चित आणि तुम्ही ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहात, जो तुम्हाला आम्हाला आपल्या जुन्या आठवणी ताज्या करून देईल आणि आपल्याला आपल्या कॉलेजच्या दिवसात रमवेल. हो… “पार्टी“ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता परंतु आता तो ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

चला तर बघूया पार्टीची टीम काय करत आहे ते? सध्या पार्टीची टीम फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी डिझायर सोसायटी, बेळगाव येथे जाऊन एचआयव्हीग्रस्त मुलांसोबत फ्रेंडशिपडे साजरा करत आहे. खरंच! पार्टीची टीम हि एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फ्रेंडशिपडे साजरा करत आहे.

आज सर्वत्र फ्रेंडशिपडेची क्रेझ खूप बदललेली असताना पार्टीच्या टीमने हा एक नवीन प्रयोग केला आहे. सुव्रत जोशीने या वर्षीचा फ्रेंडशिप डे त्यांच्याबरोबर खूप एन्जॉय केला असे तो सांगत होता. आजपर्यंत साजऱ्या केलेल्या फ्रेंडशिप डे पैकी हा एक अनोखा डे त्याने साजरा केला. “पार्टी“ या चित्रपटाचे इतर कलाकारसुद्धा तेथे हजर होते. प्राजक्ता माळी, मंजिरी पुपाला, अक्षय टांकसाळे, रोहित हळदीकर , प्रशांत लोके या सर्व कलाकार मंडळीना काही खास छोट्या दोस्तांबरोबर फ्रेंडशिप डे साजरा करून खूप मज्जा आली.

पार्टी मैत्रीचा हँगओव्हर आता ऑगस्टला नसून तर सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तर आपण तयार राहू या पार्टीसाठी येत्या ७ सप्टेंबर २०१८ रोजी.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author