बहुप्रतिक्षित ‘पिप्सी’ 27 जुलैला सिनेमाग्रहात झळकणार

बहुप्रतिक्षित पिप्सी’ 27 जुलैला सिनेमाग्रहात झळकणार

मित्रा-मित्रांमध्येही आपल्याला बऱ्याच व्हरायटी पहायला मिळतात. कोणी जीवाला जीव देणारा असतो तर कोणी जीव नकोसा करून टाकनारा असतो. एखाद्या मित्राला आपण काही दिवसातच विसरून जातो, तर काही मित्र आयुष्यभराची साथ बनून जातात. पण सगळ्यात स्पेशल मैत्री असते ती म्हणजे ‘बालपणीची मैत्री’. निस्वार्थी, निरागस अशी… प्रेक्षकांना अशाच स्पेशल मैत्रीच्या भावविश्वात घेऊन जाणारा ‘पिप्सी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मित्रांसोबत आपण आपल्या आयुष्यातील गुपितं, दुसऱ्यांना मुर्खासारखे वाटणारे आपले विचार या साऱ्या गोष्टींविषयी चर्चा करू शकतो. मित्र त्या मूर्खपणाच्या गोष्टी नुसत्या ऐकतच नाहीत, तर त्या गोष्टी करण्यामध्ये सहभाग हि घेतात. या चित्रपटात चानी आणि बाळू हे अगदी तसेच वागताना आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटात चानीची आई खूप आजारी असते, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं कि “चानीच्या आईकडे जास्तीत जास्त ३ महिनेच बाकी आहेत.” चानीला वाटत असतं कि “राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये असतो तसा माणसांचा जीव मास्यामध्ये असतो.” तेव्हा चानी विचार करते कि, “आपल्या आईचा जीव ज्या मास्यामध्ये आहे त्याला जर आपण वाचवू शकलो, तर आपल्या आईला काहीही होणार नाही.” हा विचार ती बाळूला बोलून दाखवते, मग काय..! बाळू हि चानीसोबत तिच्या आईचा जीव ज्या मास्यामध्ये आहे, त्याला शोधायला लागतो. पण त्यांच्या गावात पाण्याची मोठी समस्या असते. मग जिथे पाणीच नाही, तिथे मासा तरी कुठून येणार ? या पद्धतीच्या सूचक संदर्भांचा अंतर्भाव या चित्रपटात केल्याचं दिसून येतं.

 

READ MORE : अभिनंदन मेघा धाडे

या सिनेमाने आतापर्यंत विविध चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडली आहे.

दर्जेदार कथानक आणि मांडणी ही या कथेची जमेची बाजू तर आहेच, पण बालपणीच्या निरागस मैत्रीचे धागे कसे एकमेकांत गुंतलेले असतात हे या चित्रपटातून ठळकपणे आपल्याला पाहता येणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे रोहन देशपांडे यांनी. या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी, मैथिलीला, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सौरभ भावे लिखित ‘पिप्सी‘ या सिनेमात मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनपर भाष्य हि करण्यात आलेले आहे. ‘चानी’ आणि ‘बाळू’ यांच्या निरागस मैत्रीची अल्लड सफर अनुभवण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जावून आवर्जून पहा.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती-जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. “खुश रहा..फिल्मी रहा.”

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author