रिमेक्स – मराठी कलाकृती इतर भाषांमध्ये नव्याने बनतात तेव्हा…

आपण नेहमी ऐकतो कि अमक्या हॉलीवूड चित्रपटावरून हि फिल्म बनली… तमक्या दक्षिणेतील चित्रपटाचा बॉलीवूडमध्ये रिमेक होतोय. हे असं होण्यामागचं कारण म्हणेज त्या कलाकृती एकतर खूप गाजलेल्या असतात किंवा त्यांची संकल्पना इतकी भन्नाट असते कि निर्माते-दिग्दर्शक ती कलाकृती बनवण्याचा मोह आवरू शकत नाहीत. बरं मग असं मराठी कलाकृतींच्या बाबतीत निर्मात्या-दिग्दर्शकांना वाटलंय का?? तर हो. अशाच मराठीतून इतर भाषेत तयार करण्यात आलेल्या चित्रपटांविषयी आज आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत.

 • गोलमाल: फन अनलिमिटेड (२००६), काक्काकुईल (२०११- मल्याळम) – मराठी नाटक घर-घर वर आधारित आहे
 • भागम भाग (२००६) – बिनधास्त (१९९९) या चित्रपटावर आधारित आहे.
 • एवानो ओरुवन (२००७ – तेलगु) – डोंबिवली फास्ट (२००५)
 • पोस्टर बॉयज (२०१७) – पोस्टर बॉयज (२०१४)
 • मुंबई देल्हि मुंबई (२०१४) – मुंबई पुणे मुंबई (२०१४)
 • वेलकम ओबामा (२०१३- तेलगु) – मला आई व्हायचंय (२०११)
 • नुरोंडू नेनापू (२०१७ – कन्नड), दुनियादारी (२०१७ – गुजराती) दुनियादारी (२०१३)
 • आंध्रा पोरी (२०१५ – तेलगु) – टाईमपास (२०१४)
 • जगा हातारे पगा (ओडिया २०१५) – लय भारी (२०१४)
 • आमी जे के तोमार (२०१७- बंगाली ) – मितवा (२०१५)
 • दम लगा के हैशा (२०१५) – अगडबम (२०१०)
 • ऑक्टोबर (२०१८) – आरती – दि अननोन लव स्टोरी (२०१७)
 • सिटी ऑफ गोल्ड (२०१०)- अधांतर या नाटकावर आधारित

असे हि काही मराठी चित्रपट आहेत जे स्वतः दुसऱ्या भाषेतील चित्रपटावर प्रेरित होऊन बनले होते आणि त्या मराठी चित्रपटावर प्रेरित होऊन दुसऱ्या भाषेतील चित्रपट बनले.

 • पेईंग गेस्ट (२०१४- हिंदी), ओरी सार बरी ओलू (२००३- कन्नड), जिओ पगला (२०१७ बंगाली) – अशी हि बनवा बनवी (१९८८) – बिवी और मकान (१९६६- हिंदी मूळ चित्रपट)
 • गोलमाल रिटर्न(२००८) – फेका फेकी(१९८९) – आज कि ताजा खबर (१९७३- हिंदी मूळ चित्रपट)
 • हे बेबी (२००७) – बाळाचे बाप ब्रम्हचारी (१९८९) – three men and a baby (१९८५ –फ्रेंच, मूळ चित्रपट)
 • मासूम (१९९६) – माझा छकुला (१९९४) – होम अलोन (१९९०, मूळ चित्रपट)
 • क्युंकी मै झूट नही बोलता (२००१) – धांगड धिंगा (२०००) – लायर लायर (1997, मूळ चित्रपट)
 • टारझन (२००४) – एक गाडी बाकी अनाडी (१९८९) – क्रिस्टीन (१९८३ अमेरिकन फिल्म, मूळ चित्रपट)

येऊ घातलेले काही चित्रपट:

 • करण झोहर ‘सैराटला’ हिंदी मध्ये नव्याने बनवणार आहे ‘धडक’ या नावाने.
 • ‘झाला बोभाटा’ या फिल्मचा रोहित शेट्टी रिमेक बनवणार आहे.
 • ‘काकस्पर्श’ – हिंदी आणि तमिळमध्ये बनण्यासाठी सज्ज आहे.
 • ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित चित्रपटच चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे ज्याची निर्मिती करतोय जॉन अब्राहम
 • ‘दे धक्का’ जो ‘little miss sunshine’ या चित्रपटावर आधारित होता तो आता हिंदीमध्ये महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत असेल.
 • ‘नटसम्राट’ गुजराती भाषेत लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या भाषांमधील चित्रपटाची नवे लिहिताना चूक झाली असेल तर सांभाळून घ्या. मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.