मराठी चित्रपटांचं BOX OFFICE COLLECTION

मराठी चित्रपटांचं BOX OFFICE COLLECTION

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक प्रत्येक शुक्रवारी नवनवीन चित्रपट घेऊन येतंच असतात. पण त्याच्या मागे हि पैशांची काही गणित असतात जी आपल्याला माहित पडत नाहीत. मराठीमध्ये चांगला  चित्रपट १ कोटी मध्ये बनू शकतो. पण जे कलाकार/स्टार आहेत त्यांना काही लाखांमध्ये पैसे द्यावे लागतात. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हि भरमसाठ पैसा खर्च केला जातो. म्हणजे चित्रपट बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २ कोटीच्या आसपास खर्च जातो. मग हा निर्मात्याने घातलेला हा पैसा परत येतो कि नाही ? आला तर किती येतो…? याच प्रश्नाचं उत्तर शोधूयात या ब्लॉगमध्ये. गेल्या दीड वर्षामध्ये आलेल्या काही चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी इथे देत आहोत.

सौजन्य – Mboc

चित्रपट प्रदर्शनाची तारीख बजेट box office collection
बारायण १२ जानेवारी २ कोटी ३.४ कोटी
लग्न मुबारक १९ जानेवारी १ कोटी १.२२ कोटी
यंटम २ फेब्रुवारी ३ कोटी ३.५ कोटी
आपला माणूस ९ फेब्रुवारी ३.२ कोटी २५ कोटी
गुलाबजाम १६ फेब्रुवारी २.१ कोटी ५.२३ कोटी
बबन २३ मार्च ३.२५ कोटी ८.५ कोटी

 

चित्रपट प्रदर्शनाची तारीख बजेट box office collection
       
फास्टर फेणे २७ ऑक्टोबर ६ कोटी २७ कोटी
the silence ६ नोव्हेंबर ५.३ कोटी ४.५ कोटी
हृद्यांतर ७ जुलै ५ कोटी १५. १६ कोटी
FU: Friendship unlimited २ जून ७ कोटी ११.५४ कोटी
तलाव १० मार्च ७० लाख २.१० कोटी
प्रेम नमः ३ मार्च २० लाख ५०-९५ लाख
ध्यानीमनी १० फेब्रुवारी ३.२५ कोटी ४.१० कोटी
फुगे १० फेब्रुवारी २ कोटी ५.८० कोटी
बघतोस काय  मुजरा कर ३ फेब्रुवारी २.५० कोटी ४ कोटी
ती सध्या काय करते ६ जानेवारी २,५० कोटी २२.५४ कोटी
झाला बोभाटा ६ जानेवारी ७० लाख २.१० कोटी

मराठी सिनेसृष्ठीमधील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

  • सैराट – ११० कोटी
  • नटसम्राट – ४८ कोटी
  • लय भारी – ४० कोटी
  • कट्यार काळजात घुसली – ४० कोटी
  • टाईमपास २ – ४० कोटी
  • टाईमपास – ३३ कोटी
  • दुनियादारी – ३२ कोटी
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय – २५.५० कोटी
  • Ventilator – २५ कोटी
  • ती सध्या काय करते – २२.५४ कोटी
अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.