बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..

जानेवारी २०१९ चा फक्त दुसराच आठवडा. पण २०१९ ची सुरुवातच मराठी चित्रपट वितरकांना कष्टप्रद जाऊ लागली आहे. पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला सिनेमा होता ‘भाई’. महेश मांजरेकरांचा सिनेमा असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी थेटर आणि शोज मिळाले. तरीही प्राईम टाइम नाहीच. मोठ्या शहरात त्या मानाने कमीच शो मिळाले. महाराष्ट्राबाहेर हैदराबाद, बेंगळुरू, बडोदे अशा शहरात जिथे मराठी माणसे जास्ती प्रमाणात आहेत तिथेही भाई सिनेमाचे खेळ लावले होते. पण आता दुसऱ्या आठवड्यात २ मराठी सिनेमे आज रिलीज झाले. फाईट आणि लव्ह यु जिंदगी. त्यातील लव्ह यु जिंदगी हा सचिन पिळगावकर, कविता मेढेकर आणि प्रार्थना बेहेरे अभिनित चित्रपट महाराष्ट्रात काही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पण त्याचे शोज अत्यंत कमी आहेत. एखादा दुपारचा किंवा संध्याकाळचा स्लॉट चित्रपटगृहांनी ह्या सिनेमाला दिला आहे. त्यामुळे हा मराठी चित्रपट पाहायचं असल्यास प्रेक्षकांना फार काही चॉईस नाही. जिकडे लागलाय तिकडे जाऊन पाहायचं आणि तेही विचित्र वेळेत.

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

असो ह्या चित्रपटला महाराष्ट्रात स्क्रिन तरी मिळाले आहेत पण फाईट हा नवोदितांचा चित्रपट असल्यामुळे त्याला तर कोणीच विचारेनासे झालेय.. म्हणजे असं की फाईट चित्रपटाच्या प्रोड्युसर्स ना आणि वितरकांना गुरुवारी सगळ्या थेटर मालकांकडून सांगण्यात आले की तुम्हाला स्क्रिन देऊ शकत नाही.. सकाळचे देखील शो मिळू शकत नाहीत. ह्या दोन्ही चित्रपटांची महाराष्ट्रात ही दशा तर महाराष्ट्राबाहेर तर कोण उभे करेल…?? भाई ला एकेक का होईना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शो मिळाले, लव्ह यु जिंदगी ला महाराष्ट्रात शो मिळाले पण फाईटला तर कुठेच स्क्रिन मिळाला नाही. ह्या सगळ्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे ती बॉलिवूड च्या हिंदी सिनेमामुळे..

आज दोन मोठे बॉलिवूड चित्रपट रिलीज झाल्यामुळे त्यांच्याच शोज साठी मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच दुजाभाव दिला आहे. म्हणजे हिंदी सिनेमांना प्रादेशिक सिनेमांपेक्षा जास्ती महत्व दिले जाते आहे. खरे तर हिंदी सिनेमा दाखवण्याबद्दल काहीच आक्षेप नाही पण त्यामुळे जर प्रादेशिक सिनेमांना डावलले जात असेल तर कुठे राहिली आपली मराठी अस्मिता..?? असा दुजाभाव मराठी सिनेमांना कायम मिळत राहिला तर बनतील का मराठी दर्जेदार चित्रपट..? एकीकडे आपणच ओरडायचं की मराठी चित्रपट बनत नाहीत आणि बनले की आपण ते पाहत नाही. पहिलेच तर फक्त नावं ठेवतो. मग कसे होईल मराठी चित्रपटसृष्टीचे..? ते काही नाही. आता मराठी वितरकांना, मराठी चित्रपटाच्या इन्व्हेस्टर्सनी एकी दाखवून ही थेटरवाल्यांची मक्तेदारी मोडली पाहिजे. काही तरी उपाय काढलाच पाहिजे. नाहीच तर कोणीतरी पुढाकार घेऊन मराठी चित्रपटांची खास चित्रपटगृहे उभारली पाहिजेत आणि तिथे दिवसाचे ३ ते ४ शो मराठी चित्रपटांची लावले पाहिजेत. कँटेंट चांगलं असल्यास प्रेक्षक आपल्याआपणच मिळेल. पण बॉलिवूड मुले होणारी दैना मात्र थांबली पाहिजे. तूर्तास आपण हे दोन्ही चित्रपट चांगले चालावे ही अपेक्षा करूया..!!

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author