मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जेष्ठ दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर ‘तो मी नव्हेच’

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जेष्ठ दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर ‘तो मी नव्हेच’

मराठी रंगभूमीला अतिशय प्रतिभावान कलाकारांची परंपरा आहे. त्यातील बऱ्याच अभिनेत्यांच्या कलाकृतींनी इतिहास रचला आहे व त्या अजरामर केल्या आहेत. काही व्यक्तिरेखा या केवळ त्यांच्यासाठीच जन्माला आल्या असेही म्हणता येईल. त्या व्यक्तिरेखेला त्यांच्याशिवाय कुणी न्याय देऊ शकले असते की नाही असे नेहमी वाटत असते. आता ‘आणि डॉ काशीनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अशाच काही हरहुन्नरी अभिनेत्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे व त्यातीलच एक म्हणजे जेष्ठ दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर. मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत प्रभाकर पणशीकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नाट्यकारकिर्दीत त्यांनी अतिशय उत्तमोत्तम अशी मराठी नाटके रंगभूमीला दिली. त्या नाटकांतील त्यांचा अभिनय हा प्रत्येक नाट्यकलेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरेल इतका उच्च कोटीचा होता. त्यांनी साकारलेल्या भूमिका या खरोखरच हर किसिके बस की बात नक्कीच नव्हत्या.

‘इथे ओशाळला मृत्यू’ मधील त्यांनी साकारलेली औरंगजेबची भूमिका अतिशय गाजली होती. कणखर आवाज आणि लोभस व्यक्तिमत्व याच्या जोरावर त्यांनी मायबाप प्रेक्षकांची मने जिंकली होती. रंगभूमीवरचा त्यांचा वावर अगदी सहज असायचा. औरंगजेबची अदब त्यांनी अगदी हुबेहूब वठवली होती. त्याचं संवादकौशल्य लाजवाब होते. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील त्यांची भूमिकासुद्धा गाजली होती. त्यांच्या एकूणच अभिनय कारकिर्दीतील अजरामर ठरलेली भूमिका म्हणजे ‘ तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडेची. पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना त्यांनी रंगमंचावर अगदी जिवंत केल्या होत्या.व ते आव्हान त्यांनी अगदी लीलया पेललं होतं. त्या नाटकातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही नक्की एकाच अभिनेत्याने केली आहे का अशी शंका घेण्याजोगा तो नाट्याविष्कार होता. आजही त्यांनी साकारलेल्या लखोबा लोखंडे ह्या व्यक्तिरेखेसाठी योग्य असा दुसरा अभिनेता अस्तित्वात नाही असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

READ ALSO : “गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?” या गाण्यामागची कहाणी…

प्रभाकर पणशीकर यांना मराठी रंगभूमिला दिलेल्या योगदानाबद्दल बरेच काही सन्मान आणि पुरस्कार मिळाले. ‘आणि डॉ काशीनाथ घाणेकर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या रंगभूमिवरच्या काही आठवणी ताज्या होणार आहेत. या चित्रपटात प्रभाकर पणशीकर आणि डॉ काशिनाथ घाणेकर यांच्यातील असलेल्या हळुवार नात्याविषयीची बाजू प्रेक्षकांसमोर उलगडेल व प्रेक्षकांनाही या नात्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. या चित्रपटात प्रसाद ओक या गुणी अभिनेत्याने रंगविलेले प्रभाकर पणशीकर यांना पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी सज्ज होऊ या. ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ आपल्या भेटीस येत आहे ८ नोव्हेंबर रोजी.

फिल्मीभोंगा मराठी कडून मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author