आपलं नाव ऐकलं नाय असं येक बी गाव नाय अन धरल्या बिगर सोडलं तर माऊली आपलं नाव नाय.. आला आला रे…आला माऊली

दिवाळी म्हटलं की सर्वत्र आनंदीआनंद असतो. ह्यात जर अजून मनोरंजनाचा तडका मिळाला तर आनंद द्विगुणित होतो. असेच काहीसे 2018 च्या दिवाळीबाबत झाले आहे. यंदाच्या दिवाळीत मनोरंजनक्षेत्राने सर्व रसिक प्रेक्षकांना अनोखी भेट दिली आहे. ती म्हणजे बहुचर्चित आणि प्रतीक्षित असलेला मराठी चित्रपट,’ माऊली’. या चित्रपटाचा नुकताच दिवाळीच्या मुहूर्तावर टीजर प्रदर्शित झाला आहे. ह्या दिवाळीत मराठी चित्रपट हा अधिक समृद्ध होत आहे हे दिसून आले. मराठी चित्रपटाने हिट कडून सुपरहिटची मजल मारली आहे. टीजर प्रदर्शित झाला असून त्यात एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ‘लय भारी’ चा माऊली आता पोलिसी रुबाबात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. बेदरकार,रांगडा, मुजोर, तडफदार, देखणा, पोलीस प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल यात काहीच शंका नाही.

 

READ ALSO : गुलाबजामची चव आवडली का? तर मग वय विचारू नका…

लय भारीच्या यशानंतर रितेश देशमुख हा दुसरा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. लय भारी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील संवाद, संगीत, पेहेराव या सर्वच गोष्टी फारच गाजल्या होत्या. तश्याच फारश्या अपेक्षा प्रेक्षकांना ‘माऊली’ या चित्रपटाकडूनदेखील असणार आहे. उलाढाल, सतरंगी रे, नारबाची वाडी, क्लासमेट्स,फास्टर फेणे ह्यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारा मराठमोळा दिग्दर्शक म्हणजे आदित्य सरपोतदार. माऊली चित्रपटात आदित्यने पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे. लय भारीतिल संगीताने प्रेक्षकांना तालावर थिरकायला लावणारे संगीतकार अजय अतुल यांनी माऊली चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. यावेळेस ही जोडी प्रेक्षकांसाठी काय घेऊन येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्यांच्या अजय अतुल यांच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत. आता बघुया माऊली चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना किती वेड लावते ते?

हा चित्रपट बऱ्याच कारणांसाठी खास आहे त्यामधील अजून एक खास बात म्हणजे ‘Jio Studios’ पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे आणि माऊली हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. आता सुरुवातच माऊली ने झाली म्हंटल्यावर ‘Jio Studios’ च्या निर्मीती अंतर्गत अनेक नवीन कथानकावर आधारित चित्रपट बघायला मिळतील अशी आशा आहे.

२०१८ ची दिवाळी जशी ह्या चित्रपटाच्या टीजरने खास बनवली तसेच ह्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच १४ डिसेंबर ला बॉक्स ऑफिस हाऊसफुल करून प्रेक्षकांना अजून एक भेट मिळेल अशी अपेक्षा. तर सर्वानी तयार रहा मनोरंजनाचा अजून एक नवीन पण जरा हटके तड़क्यासाठी.  रितेश फिल्मीभोंगा मराठीकडुन तुझ्या आगामी चित्रपटाला लय भारी शुभेच्छा… ?

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author