इठ्ठला यंदा माऊली बनून आलासा आम्हाला ताराया..?!!

इठ्ठला यंदा माऊली बनून आलासा आम्हाला ताराया..?!!

आन मंग गावातलं इठ्ठलाचं मंदिर उघडलं जातंय त्ये कायमचंच..!! बोला इठ्ठल इठ्ठल इठ्ठल.. ज्ञानदेव माऊली तुकाराम..!! बोला पंढरीनाथ महाराज की जय..  असं म्हणून किर्तनकार बुवांनी आपलं कीर्तन संपवलं… शेवट ऐकून वाटलं हा कुठे तरी पाहिलाय राव..!! आठवलं रे आठवलं.. माऊली हो.. आपला माऊली.. कोण काय म्हणताय माऊली सर्जेराव देशमुख हो.. तो जित्तू कितीही टीव टीव करत राहील पिक्चर भर पण माऊली ते विठोबाचे मंदिर उघडणारच बघा.. काय? काहीच कळत नाहीये..?? ऐका तर मग..

 
 

READ ALSO :  रोहित शेट्टीचे मराठी ढंगाचे सिनेमे बंद होणार.!! कारण सिंघमची जागा घेतली दुसऱ्या हिरो ने..

आपला रितेश देशमुख आहे की नै..?? त्याने पुन्हा मराठी सिनेमा आणलाय.. त्याच नाव माऊली.. म्हणजे तोच माऊली.. विठ्ठल विठ्ठलच पण माऊली रितेश.. कळतंय ना आता..??! अंगास्स.. तर हा रितेश नुसता माऊली नाही तर आहे इन्स्पेक्टर माऊली देशमुख. इन्स्पेक्टर असताना आणि नसताना सुद्धा तो लै भारीच आहे बरं का..!! आता हिरो आला तर हिरोईन पण पाहिजे. सयामी खेर माहिती आहे का..?? नसेलच.. पण हिरोईन  ती आहे लक्षात ठेवा.. आणि ती असते माऊलीच्या अदांवर फिदा.. बरं हिरोला दोस्त हवा.. आपला सिद्धार्थ जाधव आहे ना तो आहे दोस्त कम हवालदार..! एकावर एक रोल फ्री फ्री फ्री..!! दोस्त झाला.. आणखीन कोण राह्यलं..? अरे हो खलनायक..!! तो नाही तर मसालाच नाही की भाऊ.. तर आमच्या माऊलीच्या समोर उभा टाकणार तोच गोंडस चेहऱ्याचा जिजो उर्फ जितेंद्र जोशी..

स्टोरी काय असेल?? अहो तीच नेहमीची खलनायक खोड्या काढणार अन नायक त्याला आपटून धोपटून सरळ करणार.  खलनायक पण भारीच रागीट वाटतोय हं..!! असुदेत रागीट.. आमचा हिरो पण काही कमी नाही. वर्दीत शिस्तीत म्हणजे एकदम कडक आणि जर वर्दी काढली तर मात्र खलनायकाची खैर नाही.. कूट कूट कुटलाच त्याला उखळात घालून. एकदम अन्ना स्टाईल.. अन्ना म्हणजे?? यन्ना रास्कला रजनी अन्ना..!! धो धो मारामारी बघायला मिळणार.. दुष्टांना कुटणार,  व्हिलनच्या पंटर ना कुटणार, त्याचा डावा हात, उजवा हात जो कोणी असेल त्याला पण कुटणार.. आणि शेवटी विठ्ठलाचे मंदिरच बंद करणाऱ्या खलनायकाला पण धुणार.. एवढं सगळं झाल्यावर वरची कीर्तनकार महाराजांची शेवटची ओळ खरी होणार हो महाराजा…!!!! बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..!!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author