“आयला सचिन”! आता स्वप्नील पण म्हणतोय ‘मी पण सचिन..!’

“आयला सचिन”! आता स्वप्नील पण म्हणतोय ‘मी पण सचिन..!’

 

संडे ला गल्ली बोळातल्या  लहान मोठ्या मुलांच्या  क्रिकेट मॅच ला जर प्रेक्षक म्हणून सचिन येऊन बसला  तर तोंडातून “आयला सचिन”  असा शब्द निघणारच. खरं आहे का नाही? त्याच्याशी  नातंच असं आहे आपलं. म्हणजे इतका जवळचा वाटतो तो आपल्याला. सचिनचं क्रिकेट करिअर सुरू झाल्यापासून एक मॅच पण सोडली नाही त्याची? टी व्ही वर नाहीतर लाईव्ह पण सगळ्या मॅचेस बघितल्यात. आता जो एवढ्या मॅचेस बघतो सचिनच्या त्याला त्याच्या गल्लीत तो जेंव्हा खेळत असेल तेंव्हा त्याच्या प्रत्येक स्टाईलमध्ये तो सचिन समजूनच खेळत असणार. कारण असा जर सचिन रक्तात भिनला तर त्याला तो स्वतः च सचिन आहे असं वाटलं तर त्याला काय आपण म्हणणार ?  

आवडता क्रिकेट प्लेअर , मग त्याच्या सगळ्याच लकबी आत्मसात होतात . लोक पण लगेच म्हणतात होss , अगदी सचिन सारखाच खेळतोय. मग काय सचिन सारखा स्क्वेअर ड्राइव्ह मारला असं त्याला मनातून वाटायला लागतं. मग आजकाल कुठल्याही स्टाईल चे केस वाळवून दयायला लागलेत हे सलूनवाले. हळू हळू केसांची पण व्हायला लागते सचिन स्टाईल. मग आपण सचिनसारखेच दिसतोय असं त्याला वाटायला लागतं. सेल्फी काढून बघायला लागतो. मग हातात बॅट घेऊन सेल्फी. बॉल टाकताना फोटो. असं फोटो सेशन होऊन जातं. चाल बदलते. मग सचिनसारखाच चालायचा प्रयत्न सुरू होतो. आणि मग भिनयला लागतो संपूर्ण “सचिन” अंगात….असे कितीतरी ‘सचिन’ अंगात भिनलेले सचिन आपल्याला रविवारी आझाद, किंवा ओव्हल मैदानावर पाहायला मिळतात. बघा एखाद्या रविवारी सकाळी आझाद मैदानावर फिरून. आहोsssकधी कधी आपणच म्हणतो “आयला “सचिन”, एवढे सचिन मैदनावर खेळताना दिसतील. त्या प्रत्त्येकाला मनातून आपण सचिनचं असल्यासारखं वाटत असतं.

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

अशा मनातून आपण सचिन आहोत असं वाटण्याच्या कल्पनेला खरंच साकार केलंय एक चित्रपटातून, तुम्हाला माहिती आहे का?   ” मी पण   ‘सचिन’ ” नावाचा सिनेमा येत्या काही दिवसात म्हणजे येत्या १ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. खास सचिनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. ह्या सिनेमात आत्ताचा मुंबई- पुणे- मुंबई-३ चा गाजलेला हीरो  ‘स्वप्नील जोशी’ झळकणार आहे. आणि त्याच्यासोबत आहे  आणखी एक जाना- माना आणि अत्यंत गुणी कलाकार “प्रियदर्शन जाधव”. आपल्या गल्लीबोळातल्या चाहत्यांसोबत एका गाण्यात हे दोघे धम्माल गाण्यावर  नाचताना पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटच्या हिरोच्या ह्या चित्रपटाची काहीतरी वेगळीच मजा असणार आहे. कारण  सचिनच्या नाववर निघालेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. काय पाहायला मिळणार आहे ह्या सिनेमात ही जबरदस्त उत्सुकता आहे…. पण थोsssडी वाट पहायची आहे अजून. पण लक्षात ठेवा ह्याची तारीख…!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author