काय आहे हृदयनाथच्या मागील अनोखे रहस्य

भेटूया हृदयनाथजींना

मराठी चित्रपटसृष्टी बऱ्याच वेगाने फोफावत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट, नवनवीन व उत्कृष्ट दर्जाचे कलाकार, मोठे निर्माते, दिग्दर्शक अशाप्रकारे सर्वच बाबींमुळे चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अनेक मराठी चित्रपटसृष्टीबाहेरील कलाकारही इथे येऊन मराठी चित्रपटसृष्टीला आजमावून  बघतात. ही गोष्ट केवळ कलाकारांवरच थांबत नाही तर दिग्दर्शक, निर्माते, गायक ,नृत्यदिग्दर्शक सर्वच मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी मराठी चित्रपटात काम केले आहे. लय भारी, हृदयांतर ही तशाच चित्रपटांची काही उदाहरणे. जॅकी श्रॉफ अभिनित हृदयनाथ हा देखील त्यातीलच एक चित्रपट होय.

हृदयनाथ अर्थात जॅकी श्रॉफ 

हृदयनाथ हा चित्रपट २०१२ साली २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. अमर गुप्ते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथालेखन ही केले आहे. नितेश वाघमारे यांनी हृदयनाथ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संतोष मुळ्ये यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. हृदयनाथ या चित्रपटात जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्याची भूमिका आहे. जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर आदित्य पंचोली आणि स्वरांगी मराठे यांनीदेखील हृदयनाथ या चित्रपटात अभिनय केला आहे.

हृदयनाथकथानक

चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी एका प्रामाणिक शिक्षक तात्या सावंत यांची भूमिका साकारली आहे. तात्या सावंत हे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासमवेत गावात वास्तव्यास असतात. तात्या सावंत यांच्याविषयी गावात खूप आदराची भावना असते. शिक्षक असलेल्या तात्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यांचे संपुर्ण आयुष्य कसे बदलते या विषयी चित्रपटाचे कथानक फिरते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्यांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य बदलते व ते नवाब पारकर या गुंडा सारखे वर्तणूक करू लागतात. तात्यांचा नवाब पारकर होऊन त्यांची भाषा ही पूर्णपणे बदलते. आधी प्रेमळ असणारे तात्या आता खंडणी वसूल करायला जाऊ लागतात. तात्यांचे नवाब पारकर होणे, अचानक भाषा ,वर्तणूक अशा सर्वच गोष्टी बदलणे यामुळे गावातील सगळेच  थक्क होतात.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर तात्या कसे वाचतात? शस्त्रक्रिया केल्यानंतर तात्यांचे आयुष्य कसे बदलते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला कळेल. तात्या सावंत या प्रामाणिक शिक्षकाचा नवाब पारकर नावाचा डॉन कसा होतो या संकल्पनेवर आधारित असा हा चित्रपट आहे.  हृदयनाथ या चित्रपटातून आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हीचा ग्लॅमरस अंदाज ही पाहायला मिळणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."