येडं झालं गाव…वाघेऱ्याचे मिम्स बघून

तुम्हाला नक्की हसायला येईल वाघेऱ्या चित्रपटावर आधारित या मेम्स पाहून

मेम (Meme) म्हणजे काय तर.. एखादा विचार, कल्पना, प्रतिमान किंवा एखादा व्यवहार जो आपल्या संस्कृतीमध्ये/समाजामध्ये एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत, एकमेकांच्या अनुकरणाने सहज पसरत जातो. हल्ली आपले विचार प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट गमतीदार पद्धतीने सांगण्यासाठी मेम्सचा सर्रास उपयोग होताना आपण पाहतो. असेच काही ‘वाघेऱ्या’ चित्रपटावर आधारित गमतीदार मेम्स तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. आशा आहे तुम्हाला नक्की आवडतील.

१) “प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं… तुमचं आणि आमचं सेम असतं…” असं जरी असलं तरी लफडी म्हणजे, लफडी म्हणजे, लफडी असतात.. कोणाला कशी.. तर कोणाला कशी… करायला आवडतात.. हा जांच्या त्यांचा प्रश्न आहे.

२) हिरोला, हिरोईनपर्यंत पोहोचण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, त्याला काही लोक ‘Setting’ असं म्हणतात… पण मग एखादे वेळेस setting बिघडलं तर !

३) वाघेऱ्या चित्रपटात कोंबडा, बोकड, राघु, मैना, हरीण अशा अनेक प्राणी आणि पक्षांचा उल्लेख येतो… हो म्हणजे, मानसं हि आहेत त्यात थोडी फार… पण बऱ्याच माणसांची अवस्था आणि प्राण्यांची अवस्था अगदी तशीच आहे असं जाणवतं. जसं एका गाण्यात “राघु झाडावर तडफड करतंय… आणि टकमक बघतेय मैना” अशी अवस्था त्या फोरेस्ट ऑफिसरची आहे जो नवीन बायकोला सोडून वाघ पकडायला गावात आलाय.

४) सरपंचांची बायको सरपंचाना किंमत देत नाही म्हणे, म्हणून त्यांना थोडी मदत करण्याचा माझा आपला छोटासा प्रयत्न.

५) जेव्हा मनातलं तोंडावर येतं…

 

हा होता आमचा छोटासा हास्य निर्मितीचा प्रयत्न. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा.
‘वाघेऱ्या’ – सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेला आणि गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलेलं आहे.. राहुल शिंदे आणि केतन माडीवाले हे या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत किशोर कदम, भारत गणेशपुरे, ऋषिकेश जोशी, सुहास पळशीकर, लीना भागवत, छाया कदम आणि नंदकिशोर चौगुले. हा चित्रपट १८-०५-२०१८ ला प्रदर्शित होणार आहे. थियेटर मध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहा.
मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.