मी शिवाजी पार्क: न्याय देवता आंधळी असते पण आम्ही नव्हतो!

मी शिवाजी पार्क: न्याय देवता आंधळी असते पण आम्ही नव्हतो!

 

मी शिवाजी पार्कचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर उत्सुकता निर्माण करणारा आहे. मराठी चित्रपटात आजवर अनेक विषयांवर चित्रपटनिर्मिती झाली आहे. पण हा चित्रपट नक्कीच वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. एक गूढ, एक रहस्य यातूंन आपल्याला पाहायला मिळते. पाच वयोवृद्ध मित्र त्यांचं आयुष्य सुखात घालवत असतात. अचानक काय होते कि ते एक असा निर्णय घेतात, आणि त्यांची आयुष्य बदलतात. अजून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ह्या चित्रपटात सर्व दिग्गज कलाकार मंडळी आहेत. सतीश आळेकर, शिवाजी साटम, अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर ही दिग्गज मंडळी पहिल्यांदाच एकत्र अभिनय करत आहे.

 

READ ALSO : मराठी चित्रपटातील गाण्यांची सदाबहार मैफल : भाग २

प्रेक्षकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ह्या चित्रपटाचे शीर्षक ‘मी शिवाजी पार्क’ असे का दिले असेल? शिर्षकामागे नेमके काय रहस्य असेल? असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला हा चित्रपट पाहिल्यावर नक्कीच मिळतील. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अतिशय रुचकर मेजवानी आहे. अभिनयसंपन्न दिग्गज कलाकार मंडळी आणि त्यांचा अनुभवी अभिनय आपल्याला पाहायला मिळणार.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक घटना घडली आहे आणि त्या घटनेला धरून ती पाच मित्र मंडळी काही निर्णय घेतात. तो निर्णय काय असेल? ती घटना काय आहे? अशी काय त्रुटी न्यायव्यवस्तेत आहे ज्यामुळे ती वयोवृद्ध मित्र मंडळी असा निर्णय घेतात? “न्याय देवता आंधळी असते पण आम्ही नव्हतो “यातून नेमके दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे? हा ट्रेलर बघितल्यावर मला पडलेले हे प्रश्न आहेत

महेश मांजरेकर नेहमीच एखादा निराळा पण वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट घेऊन येतात आणि त्या चित्रपटाचा दर्जाही जपतात. वेगळ्या धाटणीची चित्रपटनिर्मिती करणे व त्या चित्रपटाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणे असे त्यांचे समीकरण आहे. हा त्यांचा वेगळेपणा प्रेक्षकांना भावतो. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना भावणार. अभिराम भडकमकर यांचे लेखन अतिशय मार्मिक आहे. संवाद खूप मार्मिक आणि सूचक आहेत. लेखनशैली अतिशय उत्तम आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्की पाहावा असा आहे. मी तर हा चित्रपट नक्की पाहणार तुमचे काय?

प्रेक्षकांच्या भेटीस शिवाजी पार्क येत आहे १८ ऑक्टोबर २०१८ रोजी

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author