मिर्झापूर: श्रिया पिळगावकर

मिर्झापूर: श्रिया पिळगावकर

मिर्झापूर एक भारतातले शहर जे दहशत, गुंडगिरी यासाठी प्रसिद्ध आहे. मिर्झापुरमध्ये शस्त्रसाठा हा सहजरीत्या उपलब्ध होतो असे म्हणल्यास ते वावगे ठरणार नाही. काही शहरं ही त्यांच्या नावावरून प्रसिद्ध असतात तर काही तेथील घडणाऱ्या घटनांमुळे. तसेच काहीसे आहे मिर्झापूरबद्दल. मिर्झापूरवर एक वेबसिरीज येत आहे. अभिमानाची गोष्ट अशी की मराठी पाउल पडते पुढे या उक्तीनुसार श्रिया पिळगावकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके महागुरू सचिन पिळगावकर यांची कन्या ही ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शहरुखसोबत बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या श्रियाने अजून एक नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट, जाहिराती, वेबसिरीज अशी नवनवीन माध्यमं ती आजमावून पाहत आहे.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

मिर्झापूरआधी श्रियाने ब्रिटीश बीचम हाऊस टेलीविजन सिरीजमधेही अभिनय केला आहे. ही सिरीज गुरिंदर चढा यांनी दिग्दर्शित केली असून त्याचे संपूर्ण शूटिंग हे लंडनमध्ये झाले.  हि एक ऐतिहासिक कथा आहे, १९०० शतकातील ही कथा आहे. ही कथा दिल्लीत घडते. जेव्हा बीचम हा भारतात परत येतो तेव्हाची ही कथा आहे.  यात श्रियाची भूमिका चंचल नावाच्या युवतीची आहे. ती अभिनव सिन्हाच्या आगामी ‘अभी तो पार्टी शुरू हुई है ‘ या चित्रपटात पण असणार आहे. हा चित्रपट राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. श्रियाने खूप कमी वेळात तिच्या चाहत्यांचं एक वलय तयार केलं आहे. केवळ सचिन पिळगावकर यांची कन्या म्हणून नव्हे तर सौदर्य, बुद्धी, व अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्यातील अभिनयातील नवनवीन प्रयोग करण्याच्या वृत्तीमुळे आज ती विविध मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे व ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.

मिर्झापूर ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही कथा आहे दोन भावांची ज्यांना बंदुकीच्या जोरावर त्यांचे विश्व बनवायचे असते. अमेझॉन प्राईमवर ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. गुडू आणि बबलू हे गुन्हेगारी जगताच्या माफियाचे वकील यांची मुलं असतात. सत्ता, पैसा, ड्रग्स व गुन्हा याच्या भोवती हे कथानक फिरते. मिर्झापूर या वेबसीरिजचे दिग्दर्शन गुरमित सिंग यांनी केले आहे. करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांनी मिर्झापूरची  निर्मीती केली आहे. मिर्झापूरमध्ये तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल, विक्रांत मेसी, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी आदि कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

श्रियाच्या या नवीन वेबसिरीजसाठी तिला फिल्मिभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author