बालचित्रपट ‘मंकी बात’चा भन्नाट ट्रेलर रिलीज

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. उद्यानांमध्ये आपल्याला निरनिराळ्या रंगांची, सुगंधांची आणि आकारांची सुंदर सुंदर फुले दिसतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील अनेक रंगांचे आणि छटांचे मिश्रण असते. अशाच बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘मंकी बात’या धम्माल बालचित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक लहान मुलगा (वायू) दिसतो. त्याला सगळीकडे सतत दुर्लक्षित केले जाते. त्याच्या वयाची मुले त्याच्याबरोबर खेळत नाहीत. शाळेतील शिक्षक त्याची त्याच्या पालकांकडे तक्रार करत असतात,  सोसायटीचा वॉचमन देखील त्याच्याबद्दल सातत्याने तक्रार करत असतो. एकंदरीत सर्वांचीच वायुबाबत काही न काही तक्रार असल्याने त्याचे पालकही त्याच्यावर नाराज होतात. दुसरीकडे सतत डावललं जाण्याच्या भावनेने वायू हताश होतो. कुणीही आपलंस करत नाही या भावनेने त्याची कुचंबणा होते. “आपले वागणे नेहमीच इतरांना चुकीचे वाटते, त्यामुळे आता चुकीचेच वागायचे”, असे तो ठरवतो. पुढे जी काही धम्माल करतो ती या ट्रेलर मध्ये दिसते. तसेच यामध्ये एक अनोखे सरप्राईज दडलेले आहे, त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, वेशभूषा सगळं काही आकर्षक असतं. कधी तो कॅप घालून स्टायलिश लुकमध्ये दिसतो तर कधी नोकराच्या भूमिकेत, तर कधी मिशी वाढलेली. कधी साधी पांढरी टोपी घालून दिसतो तर कधी कामगाराचे कपडे घालून वावरताना दिसतो. विशेष म्हणजे त्याच्या हातात सतत वही, पुस्तके, चावी, फिजेट स्पिनर असे काही ना काही फिरताना दिसते ती व्यक्ती म्हणजे अवधूत गुप्ते. वेदांत आपटे आणि त्यांच्यातील अनोख्या संवादामुळे चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

मंकी बातया धम्माल बालचित्रपटाचा भन्नाट ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

दिग्दर्शक विजू माने यांची  ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकरविनोद सातवअभय ठाकूरप्रसाद चव्हाणशंकर कोंडे यांची असून विवेक डीरश्मी करंबेळकरमंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद  संदीप खरे यांचे तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे.  मंकी बात’ मध्ये बालकलाकार वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्रीभार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव आदी कलाकार आहेत बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल मनोरंजन घेउन येणारा ‘मंकी बात’ येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author